सव्वा लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > सव्वा लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त..!

सव्वा लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त..!

Spread the love

NANDED TODAY KINWAT:29,August,2021 (पत्रकार: अकरम चौहान किनवट ) सव्वा लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त. ! पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक, सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार तथा किनवट उपविभागाचे सहाय्यक वन संरक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली

नांदेड यवतमाळ सीमेवरील पैनगंगा नदीच्या काठावर लाकडापासून पाटल्या तयार करण्याच्या ठिकाणावर खरबी वन्यजीव विभाग व फिरते पथक किनवट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड व गावठी दारू तयार करण्याचे अन्य साहित्य जप्त करण्याची कारवाई केली.

पैनगंगा नदी काठावर अवैद्य दारूची भट्टी जवळ पाट्या तयारकेल्या जात आहे त्यासाठी सागवान व इतर लाकडाचा वापर केला जात आहे अशी गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल खरबी नितीन आटपाडकर यांना प्राप्त झाली आली.

त्यानुसार त्यांनी वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर फिरते पथक किनवट यांच्या सहकार्याने नदीपात्रात धाड टाकून धडक कारवाई केली घटनास्थळी जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचे वनउपज जप्त करण्यात आले

वनविभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच वन तस्करांनी घटनास्थळावरून पलायन केले घटनास्थळी आढळलेल्या दारू भट्टीच्या साहित्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जाणार आहे.

सदर कारवाई वनक्षेत्रपाल खरबी वन्यजीव नितीन आटपाडकर, फिरते पथक वनक्षेत्रपाल योगेश शेरेकर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल बोरी गजानन मोरे, वनरक्षक विजेंद्र सोनवणे, वैभव घोरपडे व वनमजूर भावसिंग जाधव, बाळकृष्ण आवले यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Total Page Visits: 990 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top