
NANDED TODAY:23,Sep,2021 अविनाश पठाडे (प्रतिनिधी) : सोनपेठ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या- चिंतामण राठोड : राष्ट्रीय बंजारा परिषदेची संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी.
रेवानाईक तांडा डीघोळ ता. सोनपेठ जी परभणी येथील अल्पवयीन मुलगी कु. मनिषा अंकुश राठोड 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तेथील आदर्श माणिक शिंदे, मयूर मुंजा मुठाळ, सुशील भागवत शिंदे, या नराधमांनी

सामूहिक बलात्कार करून त्याची चित्रफीत बनविली ही घटना कुणाला सांगितली तर जीवानीशी मारून टाकण्याची धमकी दिली, एवढ्यावरच न थांबता तूझ्या आई, वडील,भाउ यांनाही जिवानीशी मारून टाकण्याची
धमकी दिली, पिडीत मुलीने आरोपींच्या धमकी, व त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तिचेवर उपचार सुरू असताना तिने घडलेली सर्व हकीकत आई, व भावाला सांगीतली उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असून सदरची घटनामानवतेला
काळिमा फासणारी असून या निंदनिय घटनेचा राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे, सदरचाखटलल्याची अतिजलद न्यायालयात सुनावणी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने तहसिलदार माहूर
यांच्यामार्फत प्रशासनाला देऊन सदर गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी नसता राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संपूर्ण देशभर आंदोलन छेडण्यात येईल असा माहुर तालुका अध्यक्ष चिंतामण राठोड यांनी इशारा
दिला आहे. यावेळी राष्ट्रीय बंजारा परीषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित राठोड, जिल्हा संघटक सुदर्शन नाईक, तालुका संघटक शिवचरण राठोड, साहेबराव जाधव, गोर सेनेचे अर्जुन पवार, भाजपा अनुसूचित जमातीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर आदी उपस्थित होते.