स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, आ. बालाजी कल्याणकरांची सेतू समिती अभ्यासीकेला भेट.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, आ. बालाजी कल्याणकरांची सेतू समिती अभ्यासीकेला भेट.!

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, आ. बालाजी कल्याणकरांची सेतू समिती अभ्यासीकेला भेट.!

Spread the love

NANDED TODAY:26,August,2021 स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, आ. बालाजी कल्याणकरांची सेतू समिती अभ्यासीकेला भेट नांदेड- शहरातील गुरुगोविंद सिंग स्टेडियम येथे सुरू असलेल्या नांदेड सेतू समिती

अभ्यासिकेला नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी भेट दिली असून तेथील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटंनकर यांच्याशी चर्चा केली आहे.

यावेळी अभ्यासीकेत पुर्वीच्याच फीस दरा मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गोरगरीब, शेतकरी, अनुसूचित जाती जमाती, अपंग दुर्लक्षित घटकांसाठी गुरुगोविंदसिंग स्टेडियम येथे नांदेड सेतू समिती अभ्यासिका अनेक वर्षापासून सुरू केली आहे.

या अभ्यासिकेत प्रवेश मिळविण्याकरिता हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनाच या अभ्यासिकेत कमीत-कमी फीस मध्ये प्रवेश दिला जातो. नव्याने प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी पाच हजार रुपये फीस आकारणीस सुरुवात केली आहे.

एवढी फीस भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला असून मागील कोरोना काळातील तीन महिन्याची फीस देखील भरण्यास विरोध दर्शविला आहे.

गुरुवारी दुपारी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सेतू समिती अभ्यासिकेला भेट देऊन जिल्हाधिकारी डॉ. विपिनी इटंनकर यांच्याशी चर्चा केली आहे.

प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून कमीत कमी फीस घ्यावी व कोरोना काळातील तीन महिन्याची फीस विद्यार्थ्यांना माफ करून, पूर्वीसारखीच फीस घेण्याबाबत सुचना केल्या आहेत.

यांवेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी विद्यार्थ्यां सोबत अनेक विषयांवर चर्चा केली असून विद्यार्थ्यांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.

Total Page Visits: 672 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top