हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील सामूहिक रॅगिंग प्रकरणातील आरोपींवर कठोर शासन करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील सामूहिक रॅगिंग प्रकरणातील आरोपींवर कठोर शासन करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.!

हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील सामूहिक रॅगिंग प्रकरणातील आरोपींवर कठोर शासन करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.!

Spread the love

NANDED TODAY:17,Sep,2021 नांदेड,प्रतिनिधी – हादगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गोविंदराव पोळ नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या एका दलित मुलीसोबत बिभस्त रॅगिंग करून तिच्यासोबत जातीय भेदभाव करण्यात आला.पीडित विद्यार्थ्यांनीनी हे कृत्य केले

त्यांची तक्रार करावयास गेलेल्या विद्यार्थीनी समवेत त्या महाविद्यालयातील प्राध्यापकाने अश्लील गैरवर्तन केले. तिचा विनयभंग करण्यात आला.

याप्रकरणी दोषी असणाऱ्या सर्वच आरोपीवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पाच ते सहा मुलींनी एकत्र येऊन तिच्या अंगावरील कपडे काढून विवस्त्र करून तिला जमिनीवर नाक रगडण्यास मजबूर केले. तू खालच्या जातीची आहेस. तुमची हीच कामे आहेत.

असे म्हणत तिचा अवमान करण्यात आला. या अमानविय घटनेची माहिती व तक्रार देण्यास गेल्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापकाने मुली सोबतच गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला व तिचे शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देऊन सदरील प्रकरण मिटवून घेण्यासाठी दबाव निर्माण केला.

या प्रकरणातील आणखी काही आरोपी मोकाट असून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आली आहे.

यावेळी जिल्हा महासचिव श्याम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजभारे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, सुदर्शन कांचनगिरे, माधव जाधव पाटील, संजय निळेकर, श्याम नायगावे, श्यामराव कापसीकर, भाऊराव भदरगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Total Page Visits: 589 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top