
NANDED TODAY HINGOLI: 2,March,2021 हिंगोली : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी हळदीचे क्लस्टर जाहीर करून आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे गृह (ग्रामीण ) वित्त , नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास व उद्योजकता, पणन ,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन केली . यावेळी उभयतांमध्ये हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळाच्या अनुषंगाने चर्चा झाली .
हिंगोली जिल्ह्या हळदीच्या उत्पादनात अग्रेसर आहे सर्वच तालुक्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात म्हणजेच दोन लक्ष क्विंटलहळदीची अवाक असते . या संदर्भात मागील काही दिवसापासून केंद्रीय स्तरावर हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ उभारण्यात यावे. याबाबतची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती . केंद्राने याबाबत राज्याकडे सर्व अधिकार देऊन हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले होते .
यावरून राज्याच्या कृषी विभागाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठीत करून अभ्यास समितीच्या अहवालावरून हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळाच्या निर्मिती प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला होता.
नुकतेच पुणे येथे या अभ्यास समितीच्या धोरण निश्चितीसाठी एक बैठक पार पडली बैठकीमध्ये हळद उत्पादन आणि संशोधन व प्रक्रिया महामंडळाच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली . याबाबत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे तरीही ,राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हळद क्लस्टर जाहीर करून त्या ठिकाणी त्या क्लस्टरसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी
अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे गृह (ग्रामीण ) वित्त , नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास व उद्योजकता, पणन ,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन याबाबत ची मागणी आणि हळदीच्या उत्पादनात हिंगोली जिल्ह्याचे स्थान याबाबत माहिती दिली. उभयंतामध्ये यावेळी यासह हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा झाली .