90-देगलुर-बिलोली विधानसभा 2021 पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > 90-देगलुर-बिलोली विधानसभा 2021 पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित.!

90-देगलुर-बिलोली विधानसभा 2021 पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित.!

Spread the love

NANDED TODAY:06,Oct,2021 ( Dr Feroz Khan Inamdar) 90 – देगलुर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक 2021 वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोट निवडणूकीचे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार पुढीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहे.

उमेदवाराचे नाव -डॉ. उत्तम रामराव इंगोले शिक्षण- एम.बी.बी.एस.,एम.डी. (भूलतज्ञ) व्यवसाय – १८ वर्षापासून देगलूर मध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत.

उमेदवाराचा परिचय डॉ. उत्तम रामराव इंगोले मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्यात अग्रेसर असून फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून व संविधान जागरण समितीच्या माध्यमातून

त्यांनी सातत्याने सामाजिक विषयावर जागरण व आंदोलने केले आहेत. मागील दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक योगदान देताना वैद्यकीय क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत रंजल्या गांजल्या यांच्या सेवेसाठी विशेषता

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी धन्वंतरी प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे.

ग्रामीण भागात सर्पदंश याविषयी असलेले अज्ञान दूर करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. उत्तम इंगोले यांनी ग्रामीण भागात जागरणा बरोबरच सर्पदंशावर प्रभावी उपचार करून शेकडो ग्रामीण रुग्णाचे प्राण वाचवले आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
सामाजिक जाणिवा जागृत करताना रक्तदान सारख्या अति महत्त्वाच्या

विषयावर ही त्यांनी कार्य केले असून ग्रामीण भागात अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन महापुरुषांच्या जयंत्या व विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने त्यांनी आयोजित केले आहेत.

श्रद्धेय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय हाकेला ओ देऊन डॉक्टर उत्तम इंगोले यांनी गत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून डॉक्टर इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
उच्चशिक्षित असलेल्या डॉ. इंगोले यांनी वैद्यकीय सोबतच सामाजिक

योगदानही दिले आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी च्या विचारधारेची कास धरून वंचितांचा सत्तेतील सहभाग वाढला पाहिजे यासाठी कार्यतत्पर राहत श्रद्धेने नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे.

Total Page Visits: 628 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top