
नांदेड/प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच झाला असून यामध्ये महात्मा गांधी मिशन पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचा द्वितीय वर्षातील विद्यार्थी चंद्रभान सुर्यवंशी याने विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. एम.जे. द्वितीय वर्षामध्ये एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयातील चंद्रभान सुर्यवंशी या विद्यार्थ्याने 70.45 टक्के गुण घेवून यश संपादन केले असून विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याच्या या यशाबद्दल एमजीएम संस्थापक अध्यक्ष कमलकिशोर कदम, एमजीएम नांदेडच्या संचालिका डॉ. गीता लाठकर, प्राचार्य डॉ. गणेश जोशी, प्रा. प्रविणकुमार सेलूकर, प्रा. सतिश वागरे, प्रा. राजपाल गायकवाड यांच्यासह आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.