
NANDED TODAY:22,Nov,2021 नांदेड / प्रतीनिधी महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडच्या 125 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षे 2020-21 मधे बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये 180 पेक्षा जास्त जॉब ऑफर्स
मिळविल्या आहेत. विशेष म्हणजे ह्या सर्व नौकर्या (कॅम्पस प्लेसमेंट्स) विद्यार्थ्यांना त्यांचे अभियांत्रीकीचे शेवटचे वर्ष संपण्या अगोदरच प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अक्सेंचर कंपनीमध्ये 44, टीसीए 26, कॉग्नीझंट

25, इफोन्सीस 8, कॅपजेमीनी 15 अशा 30 पेक्षाही जास्त प्रसीद्ध बहूराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना या नोकर्या उपलब्ध झाल्या आहेत.यामध्ये ईनकॅम्पस प्लेसमेंटमचा देवांशू अग्रवाल (बायजूज-10 लाख),
जयेश उखळकर, मेघना लव्हेकर, अमान शेख यांना प्रत्येकी (टीसीएस – 7 लाख), वेदांत देबडवार (ईनफोसीस -5 लाख), प्रसाद नागठाणे (अॅक्सन्चर-4.5 लाख), पल्लवी डाखोरे, लिंबुरकर अमेय, मेटकुर नितीन,

दिनकले श्वेता, विनीत कोमठी, सबीनवार सुमीत, गलाकाटु वैष्णवी यासह अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रूपयांचे पगाराचे पॅकेज मिळवून स्वतःला सिद्ध केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ईनकॅम्पस नौकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षांपासूनच यासाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट
विभागाकडून आयोजित केलेल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता. द्वितीय वर्षात सॉफ्ट स्कील, तृतीय वर्षामध्ये टेक्निकल स्कील, ऑपटीट्युड स्कील आणि अंतिम वर्षात कंपनी स्पेसीफीक ट्रेनिंगमध्ये भरपूर परिश्रम घेतले होते.

कंपनीच्या अपेक्षित परिक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांनी नियोजन करून सराव केला त्यामुळेच त्यांना पदवी मिळण्यापुर्वीच नौकरीची संधी उपलब्ध झाली. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते.
महाविद्यालयाचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग पदवी मिळण्यापूर्वी नौकरी या उपक्रमावर नियोजनबद्धरित्या विविध ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी करते, त्यामध्ये सेमीनार, वेबीनार आणि समुपदेशन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ऑन कॅम्पस जॉब प्लेसमेंटचे महत्व विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच विभागाने पटवून दिले होते.

ऑनलाईनच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांनी गांभीर्याने अभ्यास करावा, यासाठी प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमागे एका प्राध्यापकाची (मेंटर) नियुक्ती करून तयारी करून घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना दिले जाणारे सततचे प्रोत्साहन, नियोजनबद्ध प्रशिक्षण, मेंटर प्राध्यापकाचे वयक्तीक लक्ष या गोष्टी विद्यार्थांच्या या उल्लेखनीय यशासाठी कारणीभूत आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशासाठी महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, संचालिका डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे, कॉम्प्युटर विभागाच्या प्रमूख डॉ.अर्चना राजूरकर, आयटी विभागाचे प्रमूख
प्रो. हाश्मी एस.ए., इलेक्ट्रॉनिक्सच्या डॉ.कल्पना जोंधळे, डॉ.सुलभा दाचावार, प्रा.ज्योती पाटील, एचओडी मेकॅनिकलचे डॉ.हरकरे, एच.ओ.डी.सिव्हील प्रो.शिंपाळे, ग्रंथपाल डॉ.गोविंद हंबर्डे, प्रा.नारायण कदम

यांनी प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच यासाठी टीपीओ प्रा. शिवप्रसाद तितरे,प्रा.रविशंकर यादव, प्रा.राजेश्वर रेड्डी आलुरवाड, प्रा.चंद्रशेखर बंदेला, प्रा.मैथिली मंगलगिरी, प्रा.जुनेद खान, आदींनी या कामी परिश्रम घेतले.