NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

फेस्काॅमच्या 34 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात “वेशीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा व्यासपिठावर परखड पणे मांडतांना नांदेडचे डाॅ.हंसराज वैद्य.

NANDED TODAY : 13,Jan, 2025लातूर नगरित 11 व 12 जानेवारीला फेस्काॅम चे 34 वे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या दिमाखात दिवानजी व श्याम मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात संपन्न झाले.

अधिवेशनाचा उद्घाटण सोहला लातूरचे नवनिर्वाचित खासदार मा.डाॅ.शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते तर मा.आमदार विक्रम काळे,फेस्काॅमचे नुतनाध्यक्ष मा.अण्णासाहेब टेकाळे,माजी अध्यक्ष मा.अरूण रोडे,मुख्य सचिव मा.चंद्रकांत महामुनी, देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 प्रादेशिक विभागातून आलेल्या जवळ जवळ आडिच हजार ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षिनी मोठ्या दिमाखात संपन्न झाला!

शेवटच्या सत्रात 14 प्रादेशिक विभागाच्या अध्यक्ष-सचिवांकडून आलेल्या सूचणांचा ठराव तयार करून लातूरच्या ज्येष्ठ नागरिक फेस्काॅमच्या अधिवेशनात पारित करून शासनाकडून मान्य करून घेऊन अंंमलात आणण्या साठी व्यास पिठावर आपली मतं पाच मिनिटात मांडावयाची संधी नांदेड उ.म.प्रा.विभागास अपशकूच चालून आलेली होती.तित आपली मते परखडपणे मांडूण डाॅ.हंसराज वैद्य यांनी दाद मिळविली!*मुद्दे असेः-

1)ज्येष्ठ नागरिकांचे सुधारीत धोरण तत्वत: अंमलात आणावे,2)ज्येष्ठ नागरिकांचा 2007 चा पारित कायदा,2010 चे पारित तथा मान्य नियम व 2013 च्या पारित कायद्यांचे तंतोतंत पालन करावे.3)जागतिक पातळीवर मान्य केल्या प्रमाणे व भारतातील इतर राज्यात प्रचलित प्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष साठ(60) च, केंद्र व राज्य शासनानेही व्यवहारात आणि शासनाने तयार केलेल्या तथा कार्यान्वित केलेल्या योजनांचा लाभ देताना कायम आणावे. 4)”श्रीमंत अर्थात सरसकट ज्येष्ठ नागरिकांना नको”, पण फक्त गरिब,गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता,निराधार तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर सरळ किमान 3500/-ते 5000/-प्रतिमहा विना अट नियमित भरण्यात यावेत.

5)ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येचा टक्का, अस्तित्व,महत्व, त्याग,राष्ट्रासाठी योगदान तथा त्यांचे समर्पण लक्षात घेऊन त्यांनां “राष्ट्रीय संपत्ती”म्हणून घोषित करावे. 6)नोंदनी कृत तथा अनोंदनी कृत मिळून ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकून जन संख्येच्या विस टक्या पेक्षाहि जास्त असल्याने,हा टक्का लक्षात घेऊन “एक ज्येष्ठ महिला व एक ज्येष्ठ पुरूष, विधान परिषदेवर आणि राज्य सभेवर घेण्याची तथा नेमण्याची तरतूद करण्यात यावी. 7)सकळ ज्येष्ठ नागरिकांनां सर्व नागरी मुलभूत सुख सुविधा तथा डसन्मान प्राधान्याने व विना अट प्रदान करण्यात याव्यात.

8)शासनाने बंद केलेले ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र,शिधा पत्र, तसेच एस टी,रेल्वे हवाई तथा जल प्रवास भाडे सूट तसेच प्रवास आरक्षण सवलती पुन:श्च सुरू कराव्यात व प्राधान्याने सर्व कार्यालये, दवाखाने तथा बँक सवलती अदि सकळ ज्येष्ठांनां विना विलंब मिळाव्यात.(9) एक एक ज्येष्ठ नागरिक हा किमान आठ मताचा (तो स्वत: व पत्नी ;+मुलगा व सुन;+ आई व बाबा ;+मूलगी व जावाई)आणि +समाजातील इतर कांही मतांचा हुकमी एक्का आहे.त्यांचे समाजात आजही कायम असलेले “स्थान व मान” आणि खरी गरज लक्षात घेउन किमान 3500/-रू ते 5000/-रू त्वरित “सन्मानधन” तथा “मानधन” चालू करून शासमनाने त्यांचा उचित गौरव करावा!**10)शासनाने “लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना” कार्यान्वित करून त्यांतर्गत विशेषतः खास साठ वर्षांवरील सर्व गरीब,,दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित,निराधार,विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना खास तथा विशेष योजना प्रदान कराव्यात

11)कोणत्याही शासकीय योजना साठी, कुठलेही आगाऊ प्रमाण पत्राच्या मागनीची अट न ठेवता फक्त “धार कार्ड,शिधा पत्र तथा ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र” च ग्राहय धरावेत.12)ज्येष्ठ नागरिकांना त्यांची दिशाभूल करणारी,भारतीय “आदर्श एकत्र कुटूंब” पद्धतीला तडा देणारी, तथा नष्ट करू पाहाणारी,तसेच वृद्धाश्रम चालविणार्‍या संस्थांनां किंवा व्यवस्थापणा साठी वरदान ठरणारी आणि “भ्रष्टाचाराचे कुरण” ठरणारी “तारांकित वृद्धाश्रम” योजना नको.13)शासनाने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 कोटीचे स्थापण केलेल्या “ज्येष्ठ नागरिक महामंडळावर” फक्त फेस्काॅचे पदसिद्ध धीकारी म्हणून निवड करताना फेस्काॅमच्या चौदा प्रादेशिक विभागातून किमान अजून तिन ते पाच सदस्यांची निवड करावी.14) शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या इतर योजना बंद करून गरजवंत ज्येष्ठ नागरीकांना उपयुक्त अशी एकमेव “लाडके ज्येष्ठ माय-बाप” योजना राबविण्यासाठी गांभिर्यांने विचार करून निर्णय घ्यावा!