NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

ओबीसी आरक्षणास, घडणात्मक संरक्षण द्या – ओबीसी नेते शब्बीर अन्सारी

NANDED TODAY: 27,Sep,2023 ( शीतल भवरे पत्रकार नांदेड़ टुडे) ओबीसी आरक्षणास, घटनात्मक आरक्षण द्या,असी मागणी ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांनी आज झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी केली.

आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले स्मारक नांदेड येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनयजरचे राष्ट्रीय अध्यक्ष सब्बीर अन्सारी यांचा सत्कार करण्यात आला.

आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने २ ऑक्टॉबर २०२३ पासून शीतल भवरे व कावेरी ढगे यांचं विविध मागण्यासाठी अमरण उपोषण करण्यात येणार आहे,या उपोषणास पाठींबा देऊन पूर्ण ताकतिने लढा देण्यास शुभेच्छा दिल्या.

ओबीसी आरक्षणास,घटनात्मक संरक्षण द्या. कंत्राटी नोकरी भरतीचे ६ सप्टेंबरचे परिपत्रक तात्काळ रद्द करा. मागासवर्गीय विध्यार्थ्यांना महागाई निर्देशांका नुसार शिष्यवृत्तीत वाढ करून, प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती द्या. दत्तक शाळा योजना रद्द करा.

या मागणीसाठी शीतल भवरे व कावेरी ढगे,या २ ऑक्टॉबर पासून, ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले स्मारक,नांदेड येथे आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणास ऑल इंडिया ओबीसी ऑरगनायजर चा पाठींबा दिला.

आज झालेल्या कार्यक्रमास श्याम निलंगेकर,ऍड. यशवंत मोरे,प्रभू सावंत,विनोद वाघमारे,कनिष्क सोनसळे, अलाऊदिम पटेल,चंद्रकांत चौदंते,यशवंत थोरात, राहुल वाघमारे,दीपक पवळे,गंगाधर वडणे,श्यामराव वाघमारे,यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.