नांदेड(प्रतिनिधी) आज सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद चौक,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या उच्च-त्रिसदस्यीय पदाधिकार्यांची डाॅ.हंसराज वैद्य यांच्या अध्यक्षते खाली, त्यांच्या कार्यालयात महत्वाची बैठक आज दुपारी तिन वाजता पार पडली.
बैठकीत होऊ घातलेल्या लोक सभेच्या निवडणूकीच्या अनुषंघाने “ज्येष्ठ नागरिक मतदाता समूहाची भूमिका व परिणाम”या विषयावर सखोल चर्चा झाली.
.
अध्यक्षिय समारोप करतांना डाॅ.हंसराज वैद्य म्हणाले की,नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मतदाता समूह हा आता अत्यंत जागरूक,सतर्क,संघटित,दूरदृष्टा, निर्भिड तथा बोलका झाला आहे!. याची प्रचिती मतदार संघात प्रचार करणार्या प्रत्येक प्रचारकाला येत असेलच.
नांदेड जिल्ह्यात लातूर लोकसभा मतदार संघाचा काही भाग व हिंगोली लोकसभा मतदार संघाचाही काही भाग समाविष्ट असल्या कारणांने नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मतदाता समूहाचा फार मोठा परिणाम लोकसभेच्या या निवडणूकिच्या निकालावर होणार आहे.शहरी तसेच ग्रामिण भागात ज्येष्ठ नागरिक संघाच्या “झोपड पट्टी,गल्ली,वस्ती,गाव,तांडा,माडा तिथे अनेक “ज्येष्ठ नागरिक संघ” शाखा स्थापण केल्या गेल्या आहेत.ज्येष्ठ नागरिकांचे बर्या पैकी प्रबोधन तथा जनजाग्रण झालेले आहे.महिला, पुरूष, विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आता नुस्ता हूषार,तर्क निष्ठच नाही तर बोलका पण झाला आहे.!प्रश्न विचारणारा हिमतबाज झाला आहे.
कुटूंब तिथे एक ते चार ज्येष्ठ नागरिक तयार झाले आहेत.एकूण जनसंख्येच्या आठरा टक्के(नोंदनीकृत-अनोंदनी कृत मिळून)ज्येष्ठ नागरिकांची मतें ज्याच्या पेटीत पडतील तो “विजयी” होणार आहे! . कुणाच्याही सभेला कितीही “अलोट गर्दी” तथा “रेकाॅर्ड ब्रेक” गर्दी झाली तरी ज्या उमेदवाराकडे ज्येष्ठ नागरिकांच्या मतांची “गर्दी”,त्याच उमेदवारास खासदारकीची “वर्दी” मिळणार आहे हे निश्चीत!.आणि ज्येष्ठ नागरिक तिकडेच गर्दी करणार आहेत, ज्या पक्षाचे राज्य स्थरिय तथा केंद्रस्थरिय (राष्ट्रीय) नेते ज्येष्ठ नागरिकांचे दुःख जाणतील व त्यावर मायेची तथा सहानुभूतीची वेळीच फूंकर घालतील!प्रलंबित प्रश्न सोडविण्याची हमी देतील. ज्येष्ठांना शेजारिल राज्या प्रमाणे सन्माची वागणूक देतील.गृहित धरणार नाहित.आमच्या प्रलंबित संविधानिक तथा न्याय मागण्या मान्य करतील. आमच्याशी बोलतील.सन्मान जनक तोडगा काढतील.मानधनाचा प्रश्न सोडवितील.अन्यथा शेवटी आम्हाला “नोटा” साठी (मानधना साठी) “नोटा”(NONE OF THE ABOVE)लाच मतदान करण्या शिवाय गत्यांतरच राहाणार नाही!.
ज्येष्ठ नागरिक आता फक्त आपल्या सुचणाची तथा आदेशाची वाट पाहात आहेत.त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मतदाता समूह हा नुस्त्या नांदेडच्या लोक सभा उमेदवाराच्या भविष्याचाच निर्णायक मतदार समूह राहिला नसून तो लातूर तथा हिंगोलीच्या भावी खासदारांचाही निर्णायक भाग्य विधाता ठरणार आहे!
सत्तेतील व सत्ते बाहेरील दोन्ही उमेदवार गुलाल उधळण्याच्या क्षणासाठी “गुडघ्याला बाशींग” बांधून तयार आहेत हे खरे असले तरी निश्चिती कुणाचीही नाही अशीच आवस्था सद्या तरी आहे! आता मतदानाला पूरते दोन आठवडेही शिल्लक राहिलेले नाहीत.नांदेडची लोक सभेची निवडणूक ही “ससा व कासवाच्या”शर्यती सारखीच होऊन बसली आहे.ब्रम्ह उघडं रे उघड…अशी अवस्था होऊन बसली आहे.सत्ताधार्यासाठी वेळ आजूनही गेलीली नाही!भविष्यात खूप कांही चमत्कारिक दडलं आहे एवढ निश्चित!
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!