NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांशी गद्यारी करणा-या व इन्शाअल्लाह, माशाअल्लाह बोलुन भाजपची भिती दाखवुन अल्पसंख्यांकांच्या मतांशी बेईमानी करणा-यासमोर प्रशासनाने पायघड्या घालु नये – वंचित बहुजन आघाडीची संतप्त सुचना!

शहरात विनापरवानगी बॅनर लावून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासनाचा शहर विद्रूपीकरण कायद्याला पायदळी तुडवीणार्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड महानगरच्या वतिने करण्यात आली आहे. तात्काळ बॅनर्स काढले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने शहरात बॅनर्स लावण्यात येतील असा इशारा देण्यात आला.या वेळी महानगर अध्यक्ष आयुब खान, विठ्ठल गायकवाड, महासचिव अमृत नरंगलकर, उत्तम धरमेकर,शेख एजाज, साहेबराव भंडारे, नंदकुमार गच्चे, कैलास जोधंळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.