नांदेड(प्रतिनाधी):- अनुभवी उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री मा.अजित दादा पवार साहेबांनी 24-25 वर्षा साठीचा महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थ संंकल्प नुक्ताच विधानसभेत सादर केला.
एकून खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रू.तरतूद असलेला भविषात होणार्या सार्वत्रिक निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थ संकल्प मांडला गेला आहे असे कुण्याही नागरिकास वाटण्यास वाव आहे.
पण या अर्थ संकल्पा मुळे कोणता मतदार समूह खूष झाला असावा हे मात्र सांगणे कठीण आहे.
शासनास नसेना का,आजही कुटूंबात आजी-आजोबा तथा आई-बाबांना मान आहे.त्यांचा सन्मान राखला जातो.कुटूंबातील सर्वजनच आजोबा-आजी तथा आई-वडिलांचे ऐकतात.ते म्हणतील ते करतात.
आंध्र प्रदेश,कर्णाटक आणि तेलंगांना या शेजारिल राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य अर्थिक दृष्ट्या श्रीमंत आहे हे कोणीही मान्य करेल.एकटी मुंबई ही भारत देशाची अर्थिक राजधानी आहे हे सर्वसृत आहे.गेल्या अनेक वर्षापासून वरील शेजारील राज्यांत तिथले शासन प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यात प्रतीमहा 3000/- ते 3500/- रू.सरळ जमा करते.तिथे ज्येष्ठ नागरिकाचे वय वर्ष साठ ग्राहय धरले जाते.ज्येष्ठ नागरिक धोरण,2007 चा ज्येष्ठांचा कायदा, 2010 चे नियम तंतोतंत अंमलात आणले जातात.ज्येष्ठांना मान सन्मान दिला जातो.सर्व मुलभूत सुविधा ज्येष्ठानां तिथले शासन पुरविते.
या उलट महाराष्ट्र राज्यात आहे. इथे त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनां हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरावे लागते. मोर्चे,धरणे अंदोलणे,भीक मागो अंदोलनें,तथा साकळी उपोषणे,करूनही वर्षानुवर्ष मागण्या मान्य केल्या जात नाहित.!मानधन दिले जात नाही.
या अंतरिम अर्थ संकल्पीय अधिवेशनात सर सकट नाही तर फक्त गरजवंत, गरिब, दुर्लक्षित, शोषित, वंचित शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी,कामगार, विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनां किमान 3500/-रू. प्रतिमहा(फक्त दोन वेळचे जेवन व चहा पाणी)देता यावे म्हणून विशेष भरिव तरतूद करावी अशी मागनी होती.
पण शासनाने आजोबा-आजी तथा आई बाबांच्या साठी चक्क शून्य अर्थिक नियोजन केले आहे.! ही अत्यंत खेद जणक तथा क्लेश दायक बाब आहे.किंबहूना महाराष्ट्र शासनाचे हे कृत्य “हर हर मोदी,घर घर मोदी” या संकल्पनेलाच छेद देणारी बाब आहे असे मला वाटते.!
महाराष्ट्र शासनाचे मोदीजींच्या “अबकी बार, 400 पार।” या घोषने विरोधी कृत्यच आहे की काय? असे म्हणण्यास वाव आहे.!
18 0/0 ज्येष्ठ नागरिक समूह हा शंभर टक्के अनूभवी तथा विश्वासू मतदाता समूह आहे.त्याला खूश केले असते तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, प्रत्येक कुटूंबात मोदीजींचा स्वंय स्फूर्थ प्रचारक म्ळणून आज पासूनच कामाला (प्रचाराला) लागला असता.तो आज कमालीचा नाराज झालेला आहे. तो कुटूंब, वस्त्याच नव्हे तर, गावंच्या गावांची मतं परिवर्तीत करू शकतो.
आजूनही वेळ गेलेली नाही.ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनाचा,प्रलंबित प्रश्नांचा व पत्रकार बंधूंच्या मागण्यांचा शासनाने त्वरित पुनर्विचार करावा व तात्काळ अंमल बजावनी करावी.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!