नांदेड टुडे (प्रतिनिधी) दि.3/11/2023:केंद्र व राज्य शासनानेही घटणेचा आधार घेऊन कुठल्याही समाज बांधवांच्या आरक्षणाला क्षति तथा धक्का न लागू देता मराठा समाजाला सरसकट आरक्षण कसे देता येईल ते त्वरित पहावे.केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये.!
मराठा समाज हा मुळातच फूले, शाहू, आंबेडकर, छ.शिवाजी महाराज तथा जाणता राजा यशवंतरावजी चव्हाण यांच्या आदर्श आचार , विचार आणि व्यवहार संस्कृतीस मानणारा समाज आहे. भारतातील व त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील बहूतांश शेतकरी, कष्टकरी, व कुणबिक करणारा हा “मराठा समाज” आहे.तो मानवच नाही तर समस्त जिवांचा पोषिंदा आहे.तो न्याय प्रिय,सहिष्णू आणि सहन शीलही आहे.
या समाजाला आता बेडर, खंबीर, निःस्पृ,नि:श्चल, नि:श्वार्थी तथा समाजा भिमूख मार्गदर्शक नेता मा.मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाणे मिळाला आहे. मराठा समाज आता जागृत होत आहे. कांही अंशी झालाही आहे.
.
जगाचा पोशिंदा असूनहि तो कुटूंबासह उपास मारीच्या अर्थात क्रांतीच्या उंबर्ठ्यावर ऊभा आहे.मराठा समाजाने आता अन्याय सहन शीलतेची परिसीमा गाठली आहे. महाराष्ट्रातील “सकल मराठा” तिथून “कुणबीच” आहे. कारण आंध्र,कर्नाटक, तेलंगाना,मराठवाडा, खानदेश, विधर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजात रोटी बेटीचे व्यवहार सध्या आजही प्रचलित असतांना काही मराठा समाजातील लोकांना “कुणबी मराठा” किंवा “मराठा कुणबी म्हणून आरक्षण सवलती मिळतात तर महाराष्ट्रातील काहीनां तथा मराठवाड्याती कुणालाही मिळत नाहित.
हा भेद भाव का केला जात आहे?त्यातल्या त्यात मराठ वाड्यातील मराठयावर (कुणबीवर)फार मोठा अन्याय केला जात आहे.
हा त्यांच्यावर अनेक वर्षापासून होत असलेला अन्यायच आहे व त्यांनी आज पर्यंत सहनही केलेला आहे . तो आता उघडा झालेला आहे.आल्प भूधारक झाला आहे.आता पर्यंत या मराठा समाजाचे एक प्रकारे शोषणच झालेले आहे.तो समाज दुसर्याचे मिळत असलेले आरक्षण काढून आम्हाला द्या असे म्हणत नाही.तो इतर मराठा समाजाला जसा “कुणबी मराठा” किंवा “मराठा कुणबी” म्हणून आरक्षणाचा लाभ मिळतो तसा सर्वच गरजवंत,वंचित तथा उपेक्षित मराठा समाजाला मिळाला पाहिजे,तो मिळावा असे गेली चार दशकापासून मागतो आहे. आणि तो वास्तव न्याय मागतो आहे.सगळाच मराठा समाज कुणबीच आहे.
शेती करणारा तथा शेती कसणारा तो कुणबीच आहे.शासन आता या गरजवंत,वंचित तथा उपेक्षित मराठा समाजालाच “कुणबी मराठा” किंवा “मराठा कुणबी” म्हणून पुरावे मागत आहे.! शासन त्या साठी पस्तीस ते चाळीस वर्षा नंतरही पुरावे व वेळ मागत आहे हे हस्यास्पद आहे. म्हणून गरजवंत,वंचित तथा उपेक्षित मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या न्याय मागणीला सर्वच समाजातून, सर्व स्थरातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे.जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज दुसर्या वेळेसचा आठवा दिवस असून प्रकृती दिवसेंदिवस ढासाळत चालली आहे.
त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून अनेक तरूणांनी अत्महत्तेचा मार्ग पत्करला आहे. अनेक लोक प्रतिनिधिंना अंदोलन कर्त्यानी गावबंधी केलेली आहे. त्यांच्या वाहानांची नासधूस, कार्यालये व घरांनां लक्ष्य केले जात आहे. करण्यात येत आहे. रस्ता रोका अंदोलने होत आहेत.मूक मोर्चे,मेनबत्ती(CANDLE )मोर्चे,सामूहिक मुंडण,जिवंतपणी स्वतःला अर्ध शरिर गाढून घेणे तथा सरणावर चढणे अदि प्रकार जनता करत आहे. लोक प्रतिनिधींचे राजनामे मागत आहेत व राजनामे देण्यास भाग पाडत आहेत. जरांगे पाटील आंदोलन कर्त्यांना कितीही घसा कोरडा करून शांतीच्या मार्गाने लढा चालू ठेवा म्हणत असले तरी आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे.
जरांगे पाटलांच्या जीवाचे जर कांही बरे वाईट झाले तर परिस्थिती आणखिनच गंभीर होऊ शकते.तेंव्हा केंद्र व महाराष्ट्र शासनाने क्षणाचाहि विलंब न लावता समन्वयाने, इतर समाज बांधवांच्या आरक्षणाला कसलीही बाधा न येऊ देता, घटणात्मक रित्या गरजवंत,वंचित तथा उपेक्षित “सरसकट मराठा” समाजाला न्याय तथा आरक्षण ध्यावे. केंद्र शासनानेही या बाबतीत राज्य शासनास विशेष अधिवेशन घेण्यास भाग पाडून, मध्यस्ती करावी.घटणेच्या चौकटित बसऊन हा तिडा तात्काळ कायम स्वरूपी वेळीच मिटवावा.!
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!