NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- फारूक अहमद

नांदेड,प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आज दिनांक 19 एप्रिल 2024 होत रोजी होत असलेल्या जाहीर सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले आहे.

भ्रष्ट व प्रस्थापीतांपेक्षा अविनाश भोसीकर सारखा लढवैय्या खासदार संसदेत पाठवा – गुरु गुडसुरकर महाराज

देशात संविधान मूल्यांची पायमल्ली होत असून सामान्य माणसांच्या हक्कावर गदा येत आहे. अशावेळी देशातील वंचित, पीडित समूहाने एकत्र येऊन प्रस्थापितांच्या हातची सत्ता हिसकावून घ्यावी व वंचितांची सत्ता येथे प्रस्थापित व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

देशात मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण हे सर्व रोखायचे असेल तर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करणे आवश्यक आहे.

केंद्रातील भाजप प्रणित सरकारने देशात धर्माच्या नावावर दुही माजविण्याचे कारस्थान रचले असून अशावेळी देशातील बहुजन, वंचित, पीडित घटकांनी एकत्र येऊन सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेणे आवश्यक आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी सातत्याने लढत आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेत शिरकाव करून वंचितांना अपेक्षित असणारे व संविधानाला अपेक्षित असणारे सरकार या ठिकाणी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवीत असून नांदेड येथून एक उच्चशिक्षित, लढाऊ बाण्याचा उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या रूपाने बाळासाहेबांनी दिला आहे.

अविनाश भोसीकर यांच्या जाहीर प्रचारासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी ठीक 12 :00 वाजता नांदेड येथील नवा मोंढा इथे असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी येणार आहेत. तेव्हा या जाहीर सभेला लोकसभा मतदारसंघातील मतदार बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून ही सभा ऐतिहासिक करावी व नांदेड जिल्ह्याच्या क्रांती भूमीतून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी संकल्प करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी केले आहे.