NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

अब्दुल सत्तार यांना विधान परिषदेवर तिकीट देऊन मुस्लिम समाजाला नेतृत्व करण्याची संधी द्यावी … पक्षश्रेष्ठीकडे खासदार आमदारसह जिल्हा काँग्रेस ची मागणी

भारतीय काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यामधून नेहमीच विजयाचा झेंडा फडकवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका नीभवणाऱ्या अब्दुल सत्तार यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाला नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसचे पक्षने द्यावी अशी मागणी नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण व आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षश्रेष्ठीकडे केलीआह


नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचे वर्चस्व जास्त प्रमाणात असून नेहमी मुस्लिम समाज काँग्रेसच्या बाजूने उभे राहून जिल्ह्यात काँग्रेसचा गड मजबूत राहिला आहे परंतु अद्याप पर्यंत मागील अनेक वर्षापासून आमदार मुस्लिम समाजाला नांदेड जिल्ह्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही
पक्षश्रेष्ठीकडे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांच्या वतीने अब्दुल सत्तार यांची शिफारस करून पक्षश्रेष्ठीकडे निवेदन सादर केले आहे की येणाऱ्या विधान परिषदेवर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाला नेतृत्व करण्याची संधी द्यावी याबाबत आमदार खासदारासह जिल्हा अध्यक्ष यांनी अब्दुल सत्तार यांची विधानसभेवर घेण्याची मागणी केली आहे


प्रत्येक निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला भक्कम साथ देऊन मागील अनेक वर्षापासून नांदेडमध्ये मुस्लिम समाजाला आमदारकीसाठी संधी दिली नाही समाजाने पक्ष श्रेष्ठ कडे मागणी केली आहे मागील 40 वर्षापासून नांदेड येथून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै.फारुख पाशा हे सतत तीन वेळा नांदेड मधून विधानसभेवर निवडून दिले होते नंतरच्या काळात पक्षाने मुस्लिम समाजाला विधान परिषदेसाठी संधी देण्याचे आश्वासन दिले होते

सध्या राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या जुलै 2024 मध्ये रिक्त होणाऱ्या विधान परिषदेसाठी मराठवाड्यामधून नांदेड जिल्ह्याला संधी देण्यात यावी यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणूक मोठा लाभ होईल याकरिता आम्ही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मुस्लिम नेते अब्दुल सत्तार अब्दुल गफुर यांच्या नावाची शिफारस करीत आहे


गेले 40 वर्षापासून ते पक्षात सक्रिय राजकारणातून समाजकार्य करीत आहे गेल्या 35 वर्षापासून ते नगरसेवक होते तसेच महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समितीचे सभापती सभागृह नेते विरोधी पक्ष नेते विविध पदे भूषवून अतिशय चांगले प्रकारे समाज हिताचे राजकारण करून समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केला आहे


सध्या नांदेड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत जिल्ह्यातील एक मोठा मुस्लिम नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचे कार्य लक्षात घेऊन आम्ही त्यांचे नाव विधान परिषदेसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कडे निवेदन देऊन केले आहे


काँग्रेस पक्षाने त्वरित 2024 मध्ये होणाऱ्या विधान परिषदेवर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाला नेतृत्व करण्याची संधी द्यावी त्यामुळे येणाऱ्या विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाला भरभरून विजय मिळेल अशी मागणी खासदार वसंत चव्हाण आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे