NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई

नांदेड:- दिनांक 15/06/2024 रोजी 03.00 वाजताचे सुमारास मौजे कौठा येथे पाच ते सहा आरोपीतांनी फिर्यादी नामे गजानन श्रीहरी येरावार, रा. कौठा ता. कंधार जि. नांदेड यांचे राहते घरी शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन सोन्याचे चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुण 41,35,000/- रुपये जबरीने चोरुन नेले होते. सदर प्रकरणात पोलीस ठाणे कंधार गु र नं. 186/2024 कलम 395, 398 भा. द. वि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर प्रकरणातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबतचे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांकडुन मिळालेल्या माहीतीप्रमाणे वरीष्ठांचे परवानगीने महराष्ट्र, गुजरात व राज्यस्थान राज्यात रवाना होवुन आरोपीतांची माहीती हस्तगत करुन आरोपी शोध घेणे चालु होते.

दिनांक 23/06/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, नमुद गुन्हयातील दरोडा टाकणारे आरोपी पैकी काही आरोपी नांदेड व काही आरोपी परभणी येथे आहेत. मिळालेली माहीती वरीष्ठांना देवुन वरीष्ठांचे आदेशाने स्थागुशाचे वेगवेगळ्या पथकासह नांदेड व परभणी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन आरोपी नामे 1) सोनुसिंघ बलविरसिंघ भोंड वय 22 वर्ष रा. उदनानगर, सुरत (गुजरात) 2) जयसिंघ शेरासिंघ बावरी वय 20 वर्ष रा. दंतेश्वर संतोषवाडी, बडोदा (गुजरात) 3) अरुण नागोराव गोरे वय 45 वर्ष रा. उस्माननगर, ता. कंधार जि. नांदेड

4) शेख खदीर शेख मगदुमसाब वय 50 वर्ष रा. इकबालनगर, धनेगाव ता जि नांदेड 5) राजासिंघ हिरासिंघ टाक वय 22 वर्ष रा. अण्णाभाऊ साठेनगर जिंतुररोड, परभणी 6) गुरुमुखसिंघ हिरासिंघ टाक वय 25 वर्ष रा. नवामोंढा जिंतुररोड, परभणी यांना ताब्यात घेवुन पो. स्टे. कंधार हद्यीतील मौजे कौठा येथील दरोड्याबाबत विचारपुस करता, त्यांनी व यातील फरार आरोपी नामे 7) सतबिरसिंघ बलवंतसिंघ टाक रा. अकोला 8) जसपालसिंघ हरीसिंघ जुन्नी रा. परतुर जि. जालना 9) राजपालसिंघ दुधानी रा. सिंदखेड राजा जि. बुलढाणा 10) सरदारखान अमीरउल्लाखान रा. पुसद जि. यवतमाळ 11) मोन्टासिंघ रा. धुळे यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

नमुद आरोपीताकडुन गुन्हयातील गेले मालापैकी 405 ग्राम सोन्याचे दागीने, 55 ग्राम चांदीचे दागीने व नगदी 8,50,000/- रुपये असा एकुण 29,43,461/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हा करताना वर नमुद आरोपीतांनी वापरलेले वाहने (मारोती स्वीफ्ट, इको मॅजीक) किंमती 5,00000/- रुपयेचे व एकुण तीन मोबाईल किंमती 45000/- रुपयाचे असे एकुण 5,45,000/- रुपयेचे वाहने व मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

वरील आरोपीतांकडुन एकुण 34,88,461/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मिळुन आलेल्या आरोपीतांना पुढील तपासकामी पो. स्टे. कंधार येथे तपासकामी देण्यात येत आहे. उर्वरीत फरार आरोपीतांना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. मिळुन आलेल्या आरोपीतांकडुन आणखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर
पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / संतोष शेकडे, रविकुमार वाहुळे, पोउपनि / आनंद
विचेवार, साईनाथ पुयड, मिलिंद सोनकांबळे यांचे पथकांनी पार पाडली आहे. सर्व पथकांचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.