NANDED TODAY: 30,Jan,2024 नांदेड,(प्रतिनिधी)-भायेगाव येथे ज्येष्ठ नागरिक जागृण मोहिमे अंतरगत गावकर्यांच्यावतीने हनुमान मंदिरात रविवारी एक व्यापक बैठक घेण्यात आली. भायेगाव ग्रामस्थ तथा आजू बाजूच्या खेड्यातील महिला पुरूष ज्येष्ठ नागरिकांनी चांगलीच उपस्थिती होती. सुरूवातीस डॉ.पुष्पा कोकीळ यांनी प्रास्ताविक केले व ज्येष्ठ नागरिकांना सखोल मार्गदर्शन केले. तर प्रभाकरराव कुंटूरकर व गिरिषराव बार्हाळे यांनी संघटनेची आवश्यकता, बांधणी, जोडणी, संघ स्थापनेचे महत्व, कार्य प्रणाली या बद्धल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सविस्तर माहिती दिली.
डॉ.हंसराज वैद्य यांनी अध्यक्षिय समारोपात ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय? कुटूंबात तथा समाजात ज्येष्ठ नागरिकांचे महत्व?, भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान तसेच आलीकडे कुटूंब, समाज आणि राजकारण्यांना पडत चाललेला ज्येष्ठ नागरिकांचा विसर या बाबतीत सुंदर मार्गदर्शन केले. ज्येष्ठांनी स्वतःला कमी लेखू नये. ज्येष्ठ हे अनुभवातून झालेले खरे सुशिक्षित आहेत. ज्येष्ठ म्हणजेच श्रेष्ठ. ज्येष्ठ म्हणजेच इष्ठ आहेत. ज्येष्ठांनी स्वतःची ताकत व स्वतःचे महत्व जाणून घेतले पाहिजे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आता लवकरच विधानसभा व लोकसभा निवडणूका होणार आहेत. आपण आता संघटित होणे अवश्यक आहे. म्हणून गल्लो-गल्लीत संघ स्थापून फेस्कॉमसी संलग्न करणें जिकरीचे आहे. आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्याची आता मोठी संधी आलेली आहे. आपण ज्येष्ठ नागरिक कुण्याही पक्षाचे नाहित. आपले नाव, गाव, वय, जात, धर्म, पंथ, गण गोत,
नातेवाईक, आपली ओळख “ज्येष्ठ नागरिक” आहे. आपला पक्ष एकच आहे. तो म्हणजे “ज्येष्ठ नागरिक पक्ष”. आजपर्यंत आपण निरपेक्ष पणे, निःस्वार्थ पणे, सामुहिक पणे व शंभर टक्के मतदान करत आलेलो आहोत. या पुढेही आपण शंभर टक्के मतदान करणारच आहोत. पण आता या पुढे मात्र आपण डोळे झाकून मतदान करणार नाहीत. सर्वच पक्ष ज्येष्ठनागरिकांना गृहित धरून चालत आहेत! सर्वच पक्षांनां ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडलेला आहे. सर्वच पक्ष ज्येष्ठांना नगन्य
समजत आहेत! महाराष्ट्र राज्यातच फक्त अजून तरी ज्येष्ठ नागरिकांना मानधन दिले जात नाही. ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले जात नाही. कुण्याहि पक्षाच्या पदाधिकाऱ्याने, नेत्याने तथा पक्षाने ज्येष्ठ नागरिकास, त्यांच्या प्रलंबित मागण्यास, ज्येष्ठनागरिकांच्या मानधनाच्या प्रश्नास पक्षांच्या जाहिरनाम्यात स्थान दिलेले दिसत नाही. इतर गोष्टीस व पद यात्रेसच महत्व दिले आहे.
पण ज्येष्ठ नागरिकास महत्व देताना दिसत नाही ही खरी शोकांकिता आहे! एक ज्येष्ठ नागरिक हा किमान सहा मतांचा (तोस्वतः, पत्नी,मुलगा,कन्या तथा जावाई ) हुकमी एक्का आहे. एकूण लोकसंख्येच्या आठरा टक्के ज्येष्ठ नागरिक समुह आहे.
तो आता संघटित झालेला आहे! ज्येष्ठ नागरिक समूह एखाद्याला निवडूण आणू शकतो व तो पाडूहि शकतो ही वस्तूस्थिती आहे! शेवटी ते म्हणाले की, जो कोणता पक्ष ज्येष्ठ नागरिक धोरण तंतोतंत अंमलात आनण्याचे, ईतर राज्यांप्रमाणे सरसकट नको पण फक्त “गरजवंत,उपेक्षित, दुर्लक्षित,वंचित, शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,कामगार, विधवा तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना 3500/- प्रतिमहा मानधन देण्याचे मान्य करेल
व आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात समाविष्ट करेल त्या पक्षाला ज्येष्ठ नागरिक समूह मतदान करेल. अर्थात “ज्या पक्षात ज्येष्ठ नागरिकांची पत,त्या पक्षाला ज्येष्ठ नागरिक समूहाचे मत!” असेल. आता येत्या निवडणूकीत कुण्याही पक्षांनी कितीही पदयात्रा काढल्याने, दलबदलू नेते फोडल्याने वा इतर अनेक पक्षांशी हात मिळवणी केल्याने तो पक्ष सत्तेत येणार नाही. शेवटी ते म्हणाले की येत्या निवडणूकित “जो पक्ष ज्येष्ठ नागरिक समूहांची शंभर टक्के मते घेईल, तोच पक्ष हमखास सत्तेत येईल”!!
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!