नांदेड शहरातील देगलूरनाका भागात नादुरूस्त रस्ते व ड्रेनेजचे रस्त्यावरून वाहणारे पाणी, रस्त्याच्या बाजुला होत असलेली पार्कींग यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
देगलूरनाका हा भाग मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखल्या जातो. महापालिकेत असला तरी या भागातील वाढीव रस्त्यामध्ये
अजूनही मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना झटावे लागत आहे. महापालिकेकडून पाणी, रस्ते, लाईट, ड्रेनेज लाईन आदी सुविधा अद्यापही या भागात पोहोचल्या नाहीत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नासाठी महापालिकेकडे वेळोवेळी निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतू महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळा जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहेत. चौका-चौकात विना परवाना धर्मांचे झेंडे लावण्यात आले आहेत त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, रस्त्यावरील खड्डे हे तात्काळ बुजविणे गरजेचे आहे.
देगलूरनाका ते माळटेकडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फंक्शन हॉल थाटण्यात आले आहेत मात्र फंक्शन हॉल कडून पार्कींगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणारे रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्किंग करत आहेत त्यामुळे अनेक वेळा वाहतूक जाम होत असते. रहदारीस अडथळा निर्माण करणार्या अशा फंक्शन हॉलवर कारवाई करावी यासह आदी मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देण्यात आले.
यावेळी गणेश तादलापुरकर, सिंधुताई देशमुख, युनूस खॉन, मोहम्मदी पटेल, शफी उर रहेमान, सईदा पटेल, नितीन मामडी, जिलानी पटेल, पंकज कांबळे, मोहम्मद सरफराज अहमद, गुलाम मुलीन, ईस्लम, सुफी तौफीक कादरी, अनिल सरोदे, सिध्दार्थ जोंधळे, वसीम, काजी शहाबुदीन, प्रभाकर भालेराव, सरदार शेख आदी जणांची उपस्थिती होती.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!