NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नुकतेच ” आज का कर्मवीर ” तसेच ” इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड “

वर्षभरात ३६५ दिवस चालणाऱ्या तीन उपक्रमासह एकूण ८९ उपक्रम चालवून समाजसेवेचा एक आगळावेगळा पायंडा पाडणारे धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नुकतेच ” आज का कर्मवीर ” तसेच ” इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड ” हे दोन पुरस्कार मिळाले असून त्यांच्या पुरस्कारांची संख्या ९२ झाल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मुंबई येथील मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात उत्तर प्रदेशचे तुरुंग व गृहरक्षक मंत्री धर्मवीर प्रजापती यांच्या हस्ते ” आज का कर्मवीर ” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, आकर्षक स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन दिलीप ठाकूर व जयश्री ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, पर्यावरण सचिव विनोद साही, कुलाब्याच्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आज का कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आर.पी.सिंग यांनी दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण सेवा कार्यामुळे त्यांची पुरस्काराची निवड करण्यात आल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली.

डोडासन बाला लोअर युथ क्लब जम्मू काश्मीर या संस्थेच्या वतीने दिलीप ठाकूर यांना ” इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड ” हा पुरस्कार नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य व भाजपाचे प्रवक्ते तथा संपादक संतोष पांडागळे यांच्या हस्ते रविवारी वितरित करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष मोहम्मद फारुख, साने गुरुजी कथामाला मुंबईचे कार्यकारी सदस्य प्रा. लक्ष्मण कोंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ .वैद्य, संतोष पांडागळे,सुखानंद महाराज यांनी दिलीप ठाकूर यांच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती देऊन कौतुक केले. शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन दिलीप ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.

दिलीप ठाकूर यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये धर्मभूषण पदवी, महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, शान ए नांदेड,देवदूत उपाधी,कर्मयोगी पुरस्कार,नांदेड के सांता,इन्स्पायर पर्सनॅलिटी अवॉर्ड,ज्योतिष्य महर्षी पाराशर स्मृती पुरस्कार, गुनिजन गौरव पुरस्कार, सन्मान पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार, बेस्ट सिग्नेचर ऍक्टिव्हिटी, कोरोना सेवा योद्धा पुरस्कार, इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन नॅशनल अवार्ड,तिरंगा गौरव पुरस्कार,अखंड सेवावृत्ती पुरस्कार,कोरोना योद्धा, कार्य सन्मान पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मान, दिनबंधू सेवा पुरस्कार, कोविड योद्धा, समाजभूषण पुरस्कार, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, मा जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभावी पुरस्कार, मातोश्री गंगुबाई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, रेअर अवॉर्ड, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय अनुग्रह पुरस्कार, लायन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवॉर्ड, सेवा सादगी सदाचार पुरस्कार, मानवता रक्षक पुरस्कार, ऊर्जा गौरव पुरस्कार, कार्य अभिमान पुरस्कार, कृतज्ञता सेवा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, कृतज्ञता उत्सव,मानवता के सेवक पुरस्कार, कोरोना योद्धा गौरव यासारख्या पुरस्कारांनी देशभरातील विविध संस्थांनी गौरव केलेला आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आपली योग्य दिशेने वाटचाल होत असल्याची प्रचिती येत असून आणखी कार्य करण्याची ऊर्जा मिळते या शब्दात दिलीप ठाकूर यांनी संयोजकांचे आभार व्यक्त केले. ९२ पुरस्कार मिळाल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.