NANDED TODAY (प्रतिनिधि ) दि. 16,जनवरी,2024 :- वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हयात यावर्षी हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने आपण सर्वजण यावर्षी नांदेड जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प करु या, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले.
यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान-2024 हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन 15 जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती दलजित कौर जज, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक संजय पेरके, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहक अधिकारी संदीप निमसे, वाहतूक निरिक्षक पोलीस निरिक्षक मारकड, गुटे,
ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेडचे पोलीस निरीक्षक एैलाने, सहा.पोलीस निरीक्षक जगताप, शिक्षणाधिकारी (प्रा) चे रोहिदास बस्वदे, शिक्षणाधिकारी (मा) प्रतिनिधी के.व्ही.पाठक, नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे शहर अभियंता दिलीप आरसुडे, अभियंता अरुण शिंदे हे उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी देशातील, राज्यातील व जिल्हयातील अपघाताची व अपघातामुळे होणारे परिणामाची माहिती दिली. नांदेड जिल्हयामध्ये यावर्षी हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे अभियान जिल्हयात पूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून यामध्ये विविध उपक्रम व तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एनएसएस, एनसीसी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विदयार्थ्यानी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या वेळी फकीरा बहुउद्येशिय सेवा भावी संस्थेचे पथकांनी जनजागृतीचा कार्यक्रम केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक, सहा.मोटार वाहन निरिक्षक व लिपीक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केलेले आहे.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!