NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेड जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्ता पदी अर्धापूरचे प्रसिद्ध पत्रकार सुभाष लोणे यांची निवड

NANDED TODAY. 31,March,2024 (Press Release ) इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष्याच्या नांदेड जिल्हा प्रवक्ता पदी ज्येष्ठ पत्रकार सुभाष लोणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र एका कार्यक्रमात लोकसभेचे उमेदवार ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आहे.

नांदेड जिल्ह्यात पत्रकार व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस व काँग्रेस पक्ष्याचा कार्यकर्ता म्हणून सुभाष लोणे यांनी जनतेशी नात निर्माण केल आहे त्यांनी नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा,

भारत न्याय यात्रेत सक्रिय सहभाग घेऊन काम केले आहे. पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यकर्ता म्हणून केलेले कार्य व पक्ष्याची भुमिका प्रभावी मांडणी करत आले आहेत ते एक संघर्षशील चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या सुभाष लोणे यांची पक्ष्याच्या नांदेड जिल्हा प्रवक्ता म्हणून निवड ही कामची नोंद आहे.

निवडीचे पत्र ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले असून लोणे यांच्या निवडीचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सुरेन्द्र घोडजकर, डॉ रॅपनवाड, गंगाधर सोंडारे, सुभाष राठोड, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, तिरुपती कोंढेकर, राजेश देशमुख, प्रकाशराव भोसीकर, शमीम अब्दुला, अशोकराव सावंत, सुभाष रायभोळे, प्रल्हाद सोळंके, डॉ. उत्तमराव इंगळे, गोविंद पाटील, दत्तराव देशमुख, आनंद लोणे यांनी निवडीचे स्वागत करुन अभिनंदन केले आहे.