NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेड पोलीसांनी जबरी चोरी व चोरी मधिल 1,91,000/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी

NANDED TODAY : नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने रेकॉर्ड वरील पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे मा.श्री सुशीलकुमार नायक,

उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, असे पोलीस उप विभाग इतवारा व नांदेड शहर हदीत पाहिजे फरारी मधिल

आरोपी शोध व अवैध धंदयावर कार्यवाही करत असताना आज दि. 01/07/2024 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन भाग्यनगर गुरन 282/2024 कलम 392,34 भादवि व पोलीस स्टेशन विमानतळ गुरन 144/2024 कलम 379 भादवि मधिल

आरोपी हे नॅशनल परमेंट लस्सी बाफना टी पाईंट येथे थांबुन आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे त्या इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 01) परमेश्वर ऊर्फ गोलु बंडु मुसळे वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा. हस्तरा ता. हदगाव जि. नांदेड 02) विष्णु बालाजी शिरफुले वय 19

व्यवसाय मजुरी रा.मु.पो.कामारी ता. हिमायतनगर जि. नांदेड ह.मु. उल्हास नगर, प्रमोद तुपतेवार यांच्या घरात भाडयाने तरोडा बु. नांदेड असे सांगितले. त्याना उपरोक्त नमुद गुन्हे संबंधाने विचारपुस केले असता त्यानी वरील गुन्हयाचा कबुली दिली आहे.

करण्यात आलेल्या कार्यवाहीत पोलीस स्टेशन भाग्यनगर येथील गुन्हयात वापरलेली मोटार सायकल, दोन मोबाईल,

इयर बडस, नगदी रोख रक्कम तसेच पोलीस स्टेशन विमानतळ मधिल एक मोटार सायकल असे एकुण 1,91,000/- मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी व मुदेमाल पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे ताब्यात दिला असुन पुढील तपास पोउपनि विनोद देशमुख हे करीत आहेत.

सदर कार्यवाही बाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा, नांदेड यांचे कौतुक केले आहे.