NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेड मध्ये महानगर पालिकेच्या वतिने नांदेडकरांच्या फप्फूसांची कत्लेआम मोहिम- डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड(प्रतिनिधी) वृक्ष म्हणजे सजीवांनां जिवंत राहण्यासाठी लागणार्‍या प्राणवायूचा सतत विनामुल्य पुरवठा करणारे कारखानेच (फॅक्ट्र्याच)एक एक मोठे वृक्ष म्हणजे सर्व सजिवांना रोज हजारो टण विना मुल्य प्राणवायू देणार्‍या सजिव यंत्रांचा निरूपद्रवी कारखानाच.!

वातावरणातला प्राण वायू आपल्या शरीरातील फप्फूसा द्वारे घेतला जातो. हवेत प्राण वायू सोडणारे एक महत्वाचे स्रोत आहे .निसर्ग दत्त फप्फूसच आहेत.कोरोना काळात आपण प्राण वायूचे महत्व पाहिले आहे.आपण अनेक जीव प्राणवायू वेळीच न मिळाल्या मूळे गमावलेली आहेत.ईतिहास फार जुना नाही.

वृक्ष हे वातावरणातले उपद्रवी कार्बनडाय आॅक्साईड व तत्सम वायू नष्ट करते व आपणास प्राण वायू देते, सावली देते,फळे देते,ईमारतीसाठी उपयुत्त लाकूड देते,सरपण देते,पक्षांनां घरटे देते,पाणी जमिनीत धरून ठेवते, पर्जन्यमान वाढविण्यास व वातावरणाचे तपमान कमी करण्यास मदत करते.ग्लोबल वार्मिंग रोकते. आणि बदल्यात काहीहि मागत घेत नाही!

तरीपण त्यावर आपण निर्दय पणे बुद्धिवंत बणून,वन विभागाची परवानगी घेऊन कुर्‍हाड चालवतो!आणि सामाजिक कार्य कर्ते,प्रिंट मेडिया,द्रुक मेडिया तथा जिवात्मा मानणारे,अध्यात्मिक महा पुरूष मंडळी गप्प रहातो.

उघड्या डोळ्यानी पहातो आहोत! आपण वृक्ष लागवडित नाही तरी वृक्ष तोड विरोधी चळवळीत तरी सहभाग नोंदवू यात.प्रदुषणात माझ्या समजूती प्रमाणे भारत देशाचा क्रमांक फार वरचा लागतो.बेंगलोर,पुणे मुंबईच्या तुलनेत नांदेड शहरात वृक्ष संख्या नगन्यच आहे.आणि आहेत ती वृक्षही रस्ता रुंदी करणाच्या नावाखाली चाळीस ते पन्नास वर्ष वयाची वृक्ष तोड होत आहे हे मला वाटते चूकीचेच आहे.

माझ्या मते वृक्षांच्या ठिकानी रस्ता थोडा वक्र झाला तरी चालेल पण वृक्ष वाचवावेत.महानगर पालिकेने त्वरित वृक्ष तोड थांबवावी.माझ्या दवाखाण्याच्या शेजारी जवळ जवळ पंचेचाळीस वर्षाचे पिंपळाचे वृक्ष आहे(माझा दवाखानाच आता चाळीस वर्षा पेक्षाही जास्त वर्षाचा आहे!) हे जर आज तोडले व त्या बदल्यात पाचशे वृक्षांची महानगर पालिकेने लागवड केली तरी या वृक्षाची बरोबरी होऊ शकते का? हे पहावे.

आपणच एकी कडे झाडे लावा ,झाडे वाचवा म्हणत आहोत व दुसरीकडे आपण प्रचंड मोठ मोठी वृक्ष तोड (कत्तल) करत आहोत! महानगर पालिकेला अशी माझी नम्र विनंती आहे की रुंदीकर णाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कत्लेआम (वृक्ष तोड) म्हणजेच जनसामान्याच्या फप्फूसाची कत्तल त्वरित थांबवावी.

श्रीनगर ,शाम नगर भाग, दालमिल समोरिल प्रचंड मोठी वृक्ष तोडून झालेली दिसून येत आहेत. आता ही वृक्ष तोड मोहिम कलामंदिर , कदम हाॅस्पिटल डाॅक्टर्स लेन पर्यंत आलेली दिसत आहे.अर्थात ही मोहिम वन विगाच्या पर्वानगीनेच झालेली असणार आहे यात शंकाच नाही! पण या पुढे आता तरी ही वृक्ष नव्हे तर नांदेड करांच्या फप्फूसाची कत्लेआम (वृक्ष तोड) थांबवावी