NANDED TODAY: 14,Sep,2023 नांदेड शहरामध्ये पाहीजे/फरारी आरोपीचे वाढते प्रमाण तसेच इतर राज्यात गुन्हे करुन नांदेड येथे आश्रय घेत असलेले आरोपी पकडण्याचे मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, यांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचेकडे बारकाईने तपास करुन आरोपी पकडण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
सदर आदेशांचे अनुषंगाने श्री. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे श्री. शिवराज जमदडे, सहा. पोलीस निरीक्षक, राजु मुत्येपोड / सपोनि, पोना / 2085 विजयकुमार नंदे, पोना / 1353 शरदचंद्र चावरे, पोकॉ/3088 बालाजी कदम, पोकों/ 3136 रमेश सुर्यवंशी पोकॉ/2896 इमरान, पोकॉ/ 14 भाउसाहेब राठोड यांनी शहरातील पाहीजे / फरारी आरोपी व पंजाब पोलीसांकडुन फरार असलेल्या आरोपीतांची माहीती घेवून आरोपीतांचा शोध घेणे चालु होते.
आज दिनांक 14.09.2023 रोजी पोलीस स्टेशन नकोधर जि जलंधर राज्य पंजाब यांचे कडुन माहीती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन नकोधर जि जलंधर येथे एका वयोवृध 68 वर्ष वयाच्या इसमास त्यांचा मुलगा नामे सतेंद्रसीग हरजीतसींग यांने धारधार शस्त्राने मारून खुन करून त्यांचे अकांउट मधुन 58000/- रू काढुन घेवून तो नांदेड येथे गुरुदवारा परीसरात पळुन आला आहे अशी माहीती मिळाली.
यावरून वर नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लंगर साहीब गुरुदवारा बाजुस नगीना घाट परीसरात सदर आरोपीचा फोटो दाखवून सदर आरोपी बाबत बारकाईने व गोपनीय बातमीदार मार्फत विचारपुस करून आरोपीचा शोध घेत असतांना सदर आरोपी सारखा एक इसम मिळुन आला त्यास पकडुन त्याचे नांव-गांव पत्ता विचारणा करता त्यांनी आपले नांव सतेंद्रसीग हरजीतसींग, वय 38 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार मकान क्र 5544 मोहल्ला पुरेवाला कॉलनी रवीदास मंदीर जवळ निकोधर जि. जलंधर असे सांगितले.
त्याचे गुन्हे अभिलेख बाबत पंजाब पोलीसांना संपर्क साधून सदर आरोपीसाठी पंजाब पोलीसांचे पथक नांदेड येथे आल्याने त्यास मा. वरिष्ठांना माहीती देवून त्यांच्या आदेशान्वये पंजाब पोलीसाकडे ताबा देण्यात आला असून पुढील तपास पंजाब पोलीस करीत आहेत.नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंजाब पोलीसांचा फरार आरोपी पकडुन त्यास पंजाब पोलीसाकडे सुपुर्द केल्याबद्दल वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!