NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

पो.स्टे. विमानतळ हाद्दीतील सुर्यदोय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना 5,49,130/- रुपयाचे मुद्देमालासह अटक.!

स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई

नांदेड टुडे : दिनांक, 08/01/2024:- घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा,

नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 08/01/2024 रोजी स्थागूशा चे सपोनि माने यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, कॅनलरोड वर सुर्यदोयनगर येथे चोरी केलेला आरोपी थांबला असल्याची प्रदेश

मिळाल्याने सपोनि माने व त्यांची टिम मिळालेल्या माहीती प्रमाणे आरोपी नामे शेख अदील शेख चॉद वय 22 वर्षे रा. सन्नाकॉलनी नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो त्याचे दोन साथीदार

  1. सय्यद जैम सय्यद अहेमद अली रा. लेबरकॉलनी नांदेड व शारेख खान रा. आसरा नगर असे मिळुन चोरी केल्याचे सांगुन त्यांने चोरी केलेले एकुण 92 ग्रॅम सोने व 280 ग्रॅम चांदीचे दागीने, मोबाईल असे एकुण 4,53,130 रुपये माल जप्त करण्यात आला

तसेच आरोपी नामे सय्यद जैम सय्यद अहेमद अली रा. लेबरकॉलनी नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन चोरीचे नगदी 35,000/- रुपये व गुन्हयात वापरलेली मो.सा. व मोबाईल असा एकुण 96,000/- रुपयाचा माल दोन आरोपी लडुन 5,49,130/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीस पो.स्टे. विमानतळ गुरन 429/2023 कलम 457,380 भादवी गुन्हयाचे तपास कामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक,

भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग माने, पाहेकॉ गंगाधर कदम, पोकॉ/ मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु, गजानन बयनवाड, राजु सिटीकर, दिपक ओडने व चालक गंगाधर घुगे व हेमंत बिचकेवार स्थागुशा,

नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

You may have missed