NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

फारुक पाशा “आमदार चषक” क्रिकेट टुर्नामेंटचे आज उद्घाटन!

नांदेडः नांदेडचे पहिले हॅट्रीक आमदार तसेच उद्योग, शिक्षण व अवकाफ विभागाचे माजी मंत्री व विधानसभेचे तत्कालीन उप-सभापती दिवंगत सय्यद फारुक पाशा यांच्या स्मृतीत आज दि. 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता “आमदार चषक” लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन

मुफ्ती अयुब क़ासमी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी राज्यमंत्री व नांदेड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,

जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, माजी मंत्री सय्यद फारुक पाशा यांचे चिरंजीव फैसल पाशा, जिल्हा पत्रकार संगठनेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, नांदेड वार्ताचे मुख्य संपादक प्रदीप

नागापुरकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, अल-हयात हॉस्पिटलचे संचालक डॉ अवैस अब्बासी, क्रिकेट असोसिएशनचे सचिव नंदु कुळकर्णी, माजी महापौर अजय बिसेन, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महानगराध्यक्ष अयुब खान, दक्षीण

महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, दक्षीण तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, उत्तर तालुकाध्यक्ष मुकुंद नरवाडे सहीत पक्षाचे विभागीय, जिल्हा, महानगर स्तराचे पदाधिकारी व फारुक अहमद मित्र परिवार उपस्थित राहणार आहे.

सदरील टुर्नामेंट मध्ये नांदेड महानगर व जिल्ह्यातून 16 टिमची नोंदणी झाली असुन नॉक-आउट पध्दतीने 13 सामन्यातुन अंतिम चार टिम सेमी फायनल व नंतर 11 फेब्रुवारी रोजी फायनल मॅच खेळतील तसेच अंतिम सामन्या नंतर लगेच बक्षिस वितरणाचे कार्यक्रम होणार आहे.

सदरील सामने दररोज दोन सकाळी 9.30 व दुपारी 1.30 या वेळा पत्रकानुसार खेळवण्यात येतील व दररोज मॅन ॲाफ द मॅचची निवड करण्यात येईल. मॅचचे क्लोज शॉट बघता यावे या हेतुने स्टेडियम मध्ये एलईडी स्क्रीन सुध्दा लावण्यात येणार असुन मॅचेस बघण्यात सुध्दा प्रेक्षकांना मजा यावी याची काळजी आयोजकांनी घेतली आहे.

या टुर्नामेंटचे आयोजन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले असुन व्यवस्थापन समीती मध्ये क्रिकेट खेळातील तज्ञ व इंडियन मुस्लिम जिमखानाचे ज्येष्ठ खेळाडु महंमद फहीम, अथर मोमीन, मोईन अ. रहीम, जावेद हाश्मी व महंमद कासीम यांनी सर्व तांत्रीक बाजु सांभाळली आहे.

नांदेडकरांनी या ऐतिहासीक टुर्नामेंटचे साक्षीदार होण्यासाठी श्री गुरुगोविंद सिंग स्टेडीयम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फारुक अहमद मित्र मंडळाच्या वतिने करण्यात आले.