NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, IPS आणि राज्य पोलीस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

NANDED TODAY: 31,Jan,2024 राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना बढती देण्यात आली असून त्यांच्याकडे होमगार्डचे महासमादेश म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार हे आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत.

वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंघल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत. गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना बढती देण्यात आली असून नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजयकुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. यापूर्वी अजय कुमार बन्सल मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.