NANDED TODAY: 23,Jan,2024 नांदेड (प्रतिनिधी)- सध्याचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी चांगली संगत धरून अपार परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि दूर्दम्य आत्मविश्वास बाळगून स्पर्धेला सामोरे जावे, अहंकार बाजुला ठेवल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येणार नाही, असे प्रतिपादन सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी केले.
सहयोग सेवाभावी संस्थेच्या युवक महोत्सव -2024 च्या उद्घाटन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या प्र-कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे यांच्याहस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलसचिव डॉ.शशिकांत ढवळे, कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय उदगीर चे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.संतुकराव हंबर्डे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करीत रहावे, आपल्या आपल्या क्षेत्रात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न बाळगावे, सहयोगच्या विद्यार्थ्यांनी असे यश गाठावे, की भविष्यात भेटण्यासाठी त्यांचा वेळ घ्यावा लागेल.
उद्घाटनपर भाषणात प्र-कुलगुरु डॉ.माधुरी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धेत सहभागी होताना यश-अपयशाची चिंता न करता चिकाटीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले.डॉ.शशिकांत ढवळे यांनी लागा चुनरी में दाग हे गायक मन्नाडे यांचे प्रसिद्ध गाणे गायिले. त्यांच्या या आवाजाला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. डॉ.ढवळे यांनी यावेळी उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख अतिथी डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांनी परिवर्तनाच्या जगात संस्कृतीला सोडून व्यक्ती प्रगती करू शकत नाही असे म्हटले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष तथा वसंत काळे कॉलेज ऑफ कॉम्पिटिशनल मॅनेजमेंट सायन्सेस चे प्राचार्य सुनिल हंबर्डे यांनी केले. सुत्रसंचालन सांस्कृतिक सचिव प्रा डॉ.प्रवीण मुळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक महोत्सव संयोजन समितीचे सचिव तथा कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ.बालाजी गिरगावकर यांनी केले.
कार्यक्रमास कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य विश्वनाथ भरकड, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस च्या संचालक डॉ.गजाला खाँन, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.प्रकाश कटकम, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल, मदर तेरेसा नर्सिंग स्कूलचे प्राचार्य सुनिल पांचाळ, इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ.जे.हरीकिशोर बाबु, इंदिरा स्कूलचे प्राचार्य विक्रम ढोणे,
आय ऑन डिजिटल झोनचे संचालक शिवानंद बारसे , प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ स्वामी, क्रीडासंचालक अशोक मेटकर, क्रीडा सचिव प्रा राजीव कदम यांच्यासह सहयोग कॅम्पस मधील सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां सह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन सोहळा पार पडला.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!