NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

शहरात भाजपाला मोठे खिंडार, युवा नेते कैलास सावते यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

NANDED TODAY 9,Sep,2023 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष बहुतांश निवडणुकांमध्ये सपाटून मार खात आहे. अलिकडल्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावरच घाला घालण्याचा प्रयोग भारतीय जनता पक्षाकडून होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर जातीपातीच्या राजकारणाला कंटाळून दलित समाजातील भाजपाचे एक मातब्बर नेते व माजी महानगर उपाध्यक्ष कैलास सावते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश करून भाजपाला शेवटचा जयभिम ठोकला.

भारतीय जनता पक्ष हा जाती आणि धर्माला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेतील अनेक कलमे बदलण्याचे षडयंत्र या पक्षाकडून रचल्या जात आहे. त्यामुळे दलित वर्गात या पक्षाविषयी द्वेषाची भावना निर्माण होत आहे.

त्यासोबतच जिल्ह्यातील स्थानिक नेतेसुद्धा याबाबीला खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. खासदाराने तर नांदेडची भाजपा चिखलीकर प्राईव्हेट लिमिटेड केली आहे. कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे कैलास सावते सारख्या युवा नेत्यांनी राज्याचे सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

कैलास सावते यांच्या प्रवेशामुळे तसा जिल्हाभरात परिणाम होणारच आहे, परंतु विशेषतः तरोड्यामध्ये भाजपासाठी मोठे खिंडार समजल्या जाते. कैलास सावते यांच्यासोबत सुरज सोनेकर, रतन लोखंडे, राजू कांबळे, आतिष थोरात, लक्ष्मीकांत तेले, बाळू दुधमल, संभाजी गायकवाड, सुनिल नरवाडे, नितीन कांबळे, सुहास कांबळे, मुन्ना कांबळे, निखिल दुंडे, आशित जाधव, कुणाल कांबळे, कुणाल थोरात, शिलवंत वाठोरे, प्रदीप भालेराव, भुषण सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजुरकर, विजय येवनकर, सतीश देशमुख, संतोष मुळे, सखाराम तुप्पेकर, विठ्ठल पाटील डक, विलास धबाले, सुभाष रायबोले, संदीप सोनकांबळे, प्रशांत तिडके, शिवाजीराव धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.