NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

शिवसेना उपशहरप्रमुख नागनाथ महादापुरे – यशवंत गौरव पुरस्काराने सन्मानित

NANDED TODAY: दिनांक 30,Jan,2024 छावा श्रमिक संघटना महाराष्ट्र व जिजाऊ प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा कामगार कल्याण केंद्र सिडको नांदेड येथे पार पाडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळेशवर महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव शंकरराव हंबर्डे होते आणि उदघाटक म्हणून शे. रा. पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून सिडको ग्रामीण पुलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक श्रीधर जगताप व ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

याप्रसंगी परम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उपशहरप्रमुख नागनाथ महादापुरे यांच्या विशेष अशा सामाजिक कार्याची दखल घेऊन यांना यशवंत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अनेक महिलांना देखील त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव हंबर्डे यांनी सामाजिक कार्याने मानसीक समाधान लाभते. तसेच न चुकता गेल्या 18 वर्षांपासून सतत हा कार्यक्रम घेत असल्याबद्दल संयोजक भास्करराव हंबर्डे यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक श्री.भास्करराव हंबर्डे यांनी केले.व सुत्रसंचलन दिगंबर शिंदे पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन अनिल धमने पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा हंबर्डे व नागनाथ गबाले यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सिडको-हडको व नांदेड शहर व जिल्ह्यातील नागरिकांची प्रचंड बहुसंख्येने उपस्थिती होती.