
नांदेड टुडे ( नईम खान @ 9960606333 ) दि. 12 ऑगस्ट :- जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल पंधरवडा-2024 निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा याअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या

मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले. 50 बालकांची श्रवणदोष तपासणी या शिबिरात करण्यात आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा चिकित्सक डॉ. संजय पेरके, तहसीलदार संजय वरकड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे, दिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलू, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक नितीन निर्मल आदींची यावेळी उपस्थिती होती.

हे शिबिर केवळ शीघ्र निदानापुरतेच मर्यादित न ठेवता येणाऱ्या काळात योग्य ते उपचार करण्यात यावे असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे 800 कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया झाली असल्याचे डॉक्टर संजय पेरके यांनी
आपल्या मनोगतात सांगितले. शिघ्र निदान, उपचाराचे महत्त्व व गरज याविषयी सविस्तर अशी माहिती नितीन निर्मल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. तहसिलदार संजय वरकड यांनी या शिबिरास शुभेच्छा दिल्या तर मुरलीधर गोडबोले यांनी सूत्रसंचालनासह सर्वांचे आभार मानले.
More Stories
शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमनांदेड परिक्षेत्र कार्यालय राज्यात द्वितीय
एनसीपी शरद चंद्रपवार गट के ज़िला शहर युवा अध्यक्ष रऊफ जमींदार की ओर से आयोजित कार्यक्रम मे ईद-उल-फितर पर पुलिस अधीक्षक अबिनाश कुमार ने दी मुबारकबाद.!
संत गोरोबा काका आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्नशील !