NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

सहयोगच्या विद्यार्थ्यांचा नांदेड पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

NANDED TODAY दि. ०६/०१/२०२५ रोजी नांदेड येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना) अंतर्गत नांदेड विधानसभेच्या २०२४ निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

निवडणूक जागरूकता निर्माण करणे आणि निवडणूक प्रक्रियेत मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विद्यार्थ्यांचा अशा कार्यक्रमांतील सहभाग स्तुत्य असल्याचे नमूद केले.

विद्यार्थ्यांचा सहभाग निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीसाठी महत्त्वाचा ठरतो, असे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे तरुणाईची जाणीवशक्ती जागृत होऊन त्यांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे करण्यात आले.सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी भारतातील युवा हा भविष्याची संप्पती आहे असे संबोधित केले आणि विद्यार्थ्यांचा योगदानाचे कौतुक केले.

इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत येणाऱ्या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राज कदम यांनी विद्यार्थानी समाज उपयोगी कार्यात योगदान द्यावे या साठी धडपड करत असतात. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय नवघरे यांनी विद्यार्थाच्या सत्काराबद्दल सांगितले की, “तरुणाईत देश बदलण्याची ताकद आहे.” सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.