NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

साक्षी रोकडे व रोहिणी सुर्यवंशी यांचीराष्ट्रीय बॉल बॕडमिंटन स्पर्धेसाठी निवड!

NANDED TODAY : दिनांक १५ ते १८ अक्टोबर २०२३ दरम्यान भिलाई – छत्तीसगड येथे होणाऱ्या ४२ व्या अॉल इंडिया सब ज्युनिअर नॕशनल बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप २०२३ – २४ साठी लातूर जिल्हा संघातील साक्षी रोकडे व रोहिणी सुर्यवंशी या दोन खेळाडूंची निवड झाली आहे

तसेच लातूर जिल्ह्याचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू अर्शद शेख यांची महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचे राज्य महासचिव श्री अतुल ईंगळे यांनी जाहीर केले…

राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्यास रौप्य पदक अर्शद शेख हे महाराष्ट्रा संघाचे प्रशिक्षक

दिनांक ०६ ते १० अॉक्टोबर २०२३ दरम्यान गडचिरोली येथे संपन्न झालेल्या ४२व्या महाराष्ट्रा स्टेट सब ज्युनिअर बॉल बॕडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ३७ संघानी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने अहमदनगर , नागपुर , वर्धा या संघाचा साखळी फेरीत पराभव करून उप उपांत्य सामन्यात यजमान गडचिरोली संघाचा पराभव केला. उपांत्य फेरीतगतविजेत्या

बलाढ्य पुणे महानगर संघाविरूद्ध विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.. अंतिम फेरीत आटितटिच्या सामन्यात पुणे जिल्हा विजेता ठरला व लातूर जिल्हा उपविजेता ठरला.

लातूर जिल्हा संघात साक्षी रोकडे, रोहिणी सुर्यवंशी , आनुराधा सुर्यवंशी , नंदिनी, स्नेहा, तन्वी, संस्कृती , अपेक्षा , स्वराली यांचा समावेश होता तर संघाचे प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू मनीषा सुर्यवंशी व अर्शद शेख हे होते.

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने निवड समिती चे डॉ हरीश काळे, सौ. मंजुषा खापरे, श्री संजय महाजन, श्री अंकित भोईर, श्री रिंकु पापडकर यांनी साक्षी व रोहिणी यांची भिलाई छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली.

महाराष्ट्र संघातील सर्व खेळाडूंना राज्य सचिव श्री अतुल ईंगळे , अध्यक्ष श्री पि.के.पटेल, कार्याध्यक्ष श्री डि.एस.गोसावी,कोषाध्यक्ष श्री विजय पळसकर, राजाभाऊ भंडारकर , जिल्हा सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री असद शेख,फैजान शेख, अध्यक्ष ज्ञानोबा भोसले (संचालक किलबील नॕशनल स्कुल), संगमेश्वर

निला,मुख्याद्यापक श्री. सुनिल शिंदे(ज्ञानवर्धिनी विद्यालय) , मुख्याद्यापिका आशा रोडगे मॕडम (संत ज्ञानेश्वर विद्यालय), प्रिती शहा मॕडम ( किडीज इन्फो पार्क ) विलास यादव सर, तानाजी कदम, अभिजीत बी.एल. राष्ट्रीय पातळीवरील स्टार अॉफ इंडिया नईम शेख,

अकबर पठाण, अदनान शेख, आय्युब जहागीरदार, तबरेज लाला , शेख नूरभाई, संजय उभारे व असद स्पोर्टस् अकॕडमी चे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या