NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

स्वतंत्र दिना च्या आधी महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विकासाचे प्रश्न सुटतील का ?

नांदेड टूडे : 8,August,2023 (शितल भवरे) नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि सुंदर अस ITI कॉर्नर इथे स्थित महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांचे स्मारक हे

शहराच्या प्रमुख आकर्षण पैकी एक आहे पण इथली स्थिती ही अत्यंत वाईट आहे इथे पाण्याची सुविधा नाही सेवक म्हणतात मोटर जळाली, माता सावित्री फुले यांच्या

पुटल्यावरचा लाईट हा बऱ्याच दिवसापासून बंद आहे आणि ते बरोबर दिसत नाही,स्मरकाच्या दोन्ही बाजूचे लाईट चे खांब हे बंद आहेत, स्मारक ची शोभा वाढवण्यासाठी

लावण्यात आलेले सर्व लाईट सरसकट किती तरी दिवसापासून बंद आहेत आणि ते दुरुस्तीला आलेले आहेत वेळोवेळी महापालिका सांगून सुद्धा त्यांनी या स्मारकाकडे दुर्लक्ष केलं

आणि याचा परिणाम की महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक वर कसलीही सुविधा नाही याचा अर्थ असा निघतो की महापालिकेचं महापुरुषां च्या पुतळ्यावर अजिबात लक्ष नाही.

(नांदेड टुडे च्या टीम ने प्रत्येक्षात स्मारकाला भेट दिली असता तेथील अडचणी दिसून आल्या.)