NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

स्वातंत्र्य दिनानिमित्त नाज़ शेख यांच्याकडून मोफत वृक्ष वितरण!नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.

NANDED TODAY: 16,August, 2024
स्वातंत्र्यदिना निमित्त सौ. नाज़ शेख (ताई) महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नांदेड यांच्या वतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.

कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार साहेबांनी प्रत्यक्ष हजेरी लावून त्यांच्या हस्ते वृक्ष वाटप करुण नाज़ शेखच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.

तसेच काँग्रेसचे आमदार पदासाठी इच्छुक उमेदवार राजेश पावडे साहेब, नांदेड़ टुडेचे तथा ह्यूमन राइट्स पीस आर्गेनाइजेशनचे डायरेक्टर नईम खान यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली तसेच या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे श्री विठ्ठल पावडे हेही आवर्जून उपस्थित होते.

वृक्ष वाटप करून सौ. नाज़ शेख (ताई) यांनी सांगितले की
ग्लोबल वार्मिंग मुळे होत असलेल्या हवामान बदलात होणाऱ्या फरकाला आळा घालण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे, ते म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक माणसाने एक एक झाड लावावे जेणेकरून हवामान बदलात जास्त फरक पडणार नाही आणि आपण ग्लोबल वार्मिंग ला थांबवू शकू.

या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी जसिका शिंदे, अर्चना ताई , सुरेखा ताई तसेच सुनिता गवळी, रिजवान पटेल व .नईम भाई हेही उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सौ. नाज़ शेख (ताई) यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले