NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात एकूण ३८ जोडपी होणार विवाहबद्ध

NANDED TODAY: 30,Jan,2024 नांदेड़- द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक १२ आणि १३ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री यादव अहिर गवळी समाज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.

सदर मेळाव्यात ३८ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत, महाराष्ट्र , तेलंगणा आणि मध्यप्रदेश येथील ४२ गावात पसलेला यादव अहिर गवळी समाज मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष दुर्गाप्रसाद गणेशलाल बटाऊवाले यांनी दिली.

मागील २५ वर्षांपासून नांदेड यादव समाज सामूहिक विवाह उपक्रम चालवीत आहे १९९९ पासून ते आजपर्यंत ८३१ जोडपी या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाहबद्ध झाले आहेत. कोणत्याही राजकीय आणि व्यक्तिगत

देणगी न स्विकारता फक्त वर- वधू कडून प्राप्त नाममात्र देणगी वर अंत्यल्प खर्चात सदर सामूहिक विवाह समारोह सर्व परंपरागत पद्धती , नीती नियमांचे पालन करून केले जाते. अशी माहिती प्रेमलाल जाफराबादी यांनी दिली.

या प्रसंगी नरसिंग मंडले, बाबुलाल राऊत्रे, धन्नूलाल भगत, गणेशलाल भातावाले, चंद्रभान बटाऊवाले, भारत राऊत्रे, डॉ. कैलाश मंडले, सुंदरलाल भातावाले तसेच समाजातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते