NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

लोहा- कंधारमध्ये प्रविण पाटील चिखलीकर यांचे वाढदिवसा निमित्त “शक्तिप्रदर्शन”; अभूतपूर्व जंगी स्वागत

नांदेड : लोहा -कंधार तालुक्यातही युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने (४ ऑगस्ट) अभूतपूर्व जंगी स्वागत करण्यात आले.बारा जेसीबीतून फुलांची उधळण ,जेसीबीतून भलेमोठे गुलाब पुष्पहार …खारीक खोबऱ्याचे हार… फटाक्यांची आतिषबाजी.. ढोलताशांच्या गजर….

अभिष्टचिंतनासाठी जागोजागी “हक्काचा माणूस” म्हणत गर्दीच गर्दी.. पुस्तके -वह्या यांचे तुला, वृक्षारोपण, ..अनेक सामाजिक उपक्रम राबवित आले. प्रविण पाटील “भावी आमदार” असा आशयाचे शुभेच्छा फलक मतदार संघात झळकले. त्याचे शक्तिप्रदर्शन पाहता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेसाठी “विद्यमान” याना जबरदस्त टक्कर प्रवीण पाटील चिखलीकर यांची असेल असा संदेश या निमित्ताने मतदारसंघात व जिल्ह्यात गेला.


दरवर्षी 4 ऑगस्ट हा लोहा -कंधार मतदार संघाचे भाजपा विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला करतो. त्याची युवा कार्यकर्ता फळी जबरदस्त आहे.
लोह्यात कथित बॅनर विटंबना प्रकरणाला राजकीय वळण देत आजच्या वाढदिवसात “विघ्न”आणण्याचा प्रयत्न झाला पण खासदार चिखलीकर यांना मानणारा मोठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी व प्रवीण पाटील यांची युवा फळी त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाले आहे.


लोह्यात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, त्याच्या सुविद्य पत्नी वैशालीताई, भगिनी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.प्राणिताताई देवरे चिखलीकर याचे जंगी स्वागत करण्यात आले. सचिन पाटील चिखलीकर, ऍड.संदीप पाटील चिखलीकर, संजय पाटील घोगरे, भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, लक्ष्मणराव बोडके यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपसभापती मारुती पाटील बोरगावकर, प्रा.डॉ.डी.एम.पवार, हरिभाऊ चव्हाण, दिनेश टेललवार, नगरसेवक करीम शेख, भास्कर पवार, बालाजी खिल्लारे, गणेश बगाडे, पत्रकार शेख अहमद, हरिहर धुतमल, रत्नाकर महाबळे, इमाम लदाफ,शेख पटेल, सिकंदर शेख, घंटे यासह वटमवार, मुकदम परिवार यांनी अभिष्टचिंतन केले. दीपक पाटील कानवटे यांनी जेसीबीने पुष्पहार घातला. पुस्तके-वह्या या शैक्षणिक साहित्याने प्रवीण पाटील यांची तुला केली.

शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पवार, सचिन मुकदम, अनिल धुतमल, पारडीचे सरपंच पवार, सूर्यकांत गायकवाड, प्रवीण धुतमल, भारत कदम, बंडू वडजे, भानुदास पाटील, शहाजी पाटील यासह
मित्र परिवार यांनी जंगी स्वागत करत अभिष्टचिंतन केले. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे कंधारचे तहसीलदार राम बोरगावकर, भारतीय जनता पार्टीचे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, नगरसेवक जनार्दन गुपिले,

भाजपा कंधार तालुका अध्यक्ष भगवानराव राठोड, बालाजी पाटील मारतळेकर, शंकरराव ढगे, वीरभद्र राजुरे, संदीप देशमुख, साईनाथ पाटील टर्के, गुलाब पाटील उबाळे, केरबा पाटील कापशीकर, , गंगाप्रसाद यन्नावार, निलेश गौर, साईनाथ कपाळे, वारकड गुरुजी, साईनाथ कोळगिरे, सुभाष तोटेवाड, दीपक कानवटे, प्रा.प्रकाशराव पाटील घोरबांड, श्रीधर गोरे, शंकरराव नाईक, संजय देशमुख कोठेकर, अर्जुन राठोड यासह अनेकांनी अभिष्टचिंतन केले


लोहा नगरपालिका, जिज्ञासा अभ्यासिका , छोटा हती चालक मालक संघटना यासह विविध सामाजिक संघटनां विविध राजकीय, पदाधिकारी, व्यापारी , कर्मचारी , पत्रकार , कार्यकर्ते दोन्ही तालुक्यातील मोठया संख्येने कार्यकर्ते यांनी अभिष्टचिंतन केले मोठा वाहनांचा लवाजमा होता लोह्यात ट्राफिक जाम झाली होती, एवढी प्रचंड गर्दी होती.