NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नानक साई फाऊंडेशनचे संत नामदेव लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड जाहीर : तारीख ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे वितरण

नांदेड (प्रतिनिधी)- येथील नानक साई फाऊंडेशनच्या वतीने दिले जाणारे संत नामदेव लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या मान्यवरांचा पुरस्कारात समावेश आहे.

नानक साई फाऊंडेशनच्या वतीने तारीख ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या मान्यवरांचा नानक साई फाऊंडेशनच्या वतीने संत नामदेव लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड देऊन सन्मान केला जातो. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव,सालासर भजन मंडळ नांदेड,श्री कवी संत दासगणु महाराज साई भक्त मंडळ गोरटे उमरी,श्री एकता गणेश मंडळ तरोडा यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव होणार आहे अशी माहिती नानक साई फाऊंडेशन चे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी दिली आहे.

यावर्षी चे संत नामदेव लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड मेजर दत्तात्र्यय बचाटे,सरदार लडूसिंघ महाजन, शंकरराव सिंगेवार,कुमारी नवेली देशमुख,डॉ. शिवाजीराव शिंदे,डॉ रमेश नारलावार ,डॉ कल्पना दिलिप पाटील,डॉ पुरुषोत्तम दाड,कुबेर राठोड,प्राचार्य पी एम पवार,डॉ. श्रावण रॅपनवाड,माधवराव आटकोरे ,केशवराव पवार निवघेकर ,सौ.ललिता चरणसिंग पवार,

जनार्धन पाटील हिंगोली,कुमारी स्नेहल भालेराव,हणमंतराव तरटे ,,शाहीर वजीरगांवकर, यांना जाहीर करण्यात आला आहे. तारीख ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.