NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

अमृत योजनेत नांदेडच्या रेल्वे स्टेशन चा समावेश : नांदेड , मुदखेड , धर्माबाद , उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट : खा. प्रतापराव पाटील

NANDED TODAY: 6,Feb,2024 नांदेड : अमृत योजनेअंतर्गत नांदेड सह मुदखेड, धर्माबाद ,उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असून यासाठीच आवश्यक तो निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. ही रेल्वे स्टेशन अत्याधुनिक अशी होतील अशी माहिती खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

देशभरातील रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम रेल्वे सेवा देता यावी. रेल्वेचे जाळे विणले जावे या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्र्यातून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात एकूण 34 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. 5772 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून 80 हजार 184 कोटी रुपयांचा निधी यासाठी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. शिवाय महाराष्ट्रातील 126 स्थानके अमृत स्टेशन म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता .

यासाठीच आवश्यकता निधीही मंजूर करण्यात आला आहे . नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड जंक्शन, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर आणि किनवट या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणारा असून यासाठीचा निधी प्राप्त झाला आहे . त्यामुळे अत्यआधुनिक सोयी सुविधांसह

नांदेड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक रेल्वे प्रवाशांचे सेवेसाठी सिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देतानाच नांदेड जिल्ह्यातील हुजूर साहेब नांदेड , मुदखेड जंक्शन, धर्माबाद, हिमायनगर , किनवट या रेल्वे स्थानकाचा समावेश केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत.