NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत, नांदेडवरून चेन्नईला रवाना!

नांदेड दि. ४ : श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले.

   विमानतळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.हेमंत पाटील, खा.डॉ.अजित गोपछडे, आ.राम पाटील रातोळीकर,आ. तुषार राठोड,आ.राजेश पवार, आ.बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.