NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेड पोलिस का बडा धमाका,नांदेड जिल्हयात मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआढ! 61 मोटार सायकल, सहा आरोपी सह 21,47,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. 51 गुन्हे उघड.

स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई

नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 18/03/2024 रोजी श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, किनवट येथील काही इसमाकडे चोरीचे मोटार सायकल आहेत अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे पोउपनि / आनंद बिचेवार व सचिन सोनवणे यांचे दोन पथकांना किनवट येथे रवाना केले. स्थागुशाचे पथकांनी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी जावुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सहा संशईत इसम

नामे 1) बालाजी आभिमान माने वय 27 वर्षे व्यवसाय मजुरी रा. भावेश्वरनगर चौफाळा, नांदेड ता. जि. नांदेड ह. मु. सिध्दार्थनगर गोकुंदा, ता. किनवट जि. नांदेड 2) दिपक सुरेश कोकुर्ले वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. शनिवारपेठ, किनवट 3) विकास शेषेराव शिंदे वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. प्रधान सांगवी ता. किनवट जि नांदेड 4) रमेश श्यामराव कयापाक वय 38 वर्ष व्यवसाय बेकार रा. तरोडा खुर्द बेलानगर, नांदेड ह. मु. कोठारी ता. किनवट 5) राजु दादाराव भगत वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. कोठारी ता. किनवट 6) शफी फकरोद्यीन सय्यद वय 23 वर्ष व्यवसाय बेकार रा. कोठारी ता किनवट यांना यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले.

त्यांचेकडुन सोबत दिलेल्या तक्त्यातील वर्णनाचे 61 मोटार सायकल किंमती 21,47,000/- रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले असुन त्यामध्ये नांदेड जिल्हयातील एकुण 51 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. उर्वरीत 10 मोटार सायकल चोरीचे गुन्हयाबाबत शहानिशा करुन संबंधीत पोलीस ठाणेस देण्यात येत आहे. नमुद आरोपीकडुन इतर आरोपी व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नमुद आरोपीतांकडुन चोरीची मोटार सायकल खरेदी करणारे इसमाविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपीतांना पुढील तपासकामी संबंधीत पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक. स्थागूशा नांदेड, पोउपनि/आनंद बिचेवार, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अमंलदार माधव केंद्रे, गुंडेराव करले, सुरेश घुगे, संजिव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगीरवाड, गजानन बयनवाड, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु, रणधीर राजबन्सी, धम्मा जाधव, हेमंत बिचकेवार, गंगाधर घुगे, हनुमानसिंह ठाकुर स्थागुशा नांदेड व सायबर सेल चे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण, व्यंकटेश सांगळे यांचे पथकांनी पार पाडली आहे.

मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी जिल्हयातील जनतेस आपले मोटार सायकल पार्कीग करताना आवश्यक ती काळजी घेण्याबाबत व कमी किंमतीत कोणी चोरीची मोटार सायकल देत असल्यास पोलीसांना संपर्क करण्याबाबत आव्हान केले आहे.