NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही.!

NANDED TODAY : 19, June,2024 – धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात अचानक धाडी टाकून एकूण 30 तंबाखू विक्रेत्यांकडून 14 हजार रुपये दंड आकारण्यात आला.

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. वेणुगोपाल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर,

सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक नितीन आडे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमरे व पोलीस कॉन्स्टेबल सुपारे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.