NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

खडकपुरा मदीना हॉटेलचे मालक युनूस भाईच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद.!

मयताच्या मुलांसह इतर दोन आरोपीना केले अटक
वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

मा. श्री अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. सुरज गुरव अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्रीमती, किरितिका सी.एम. सहायक पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर,

यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दिनांक 01/09/2024 रोजी पोलीस ठाणे वजिराबाद गुरंन 440/2024 कलम 103 (1) भा. न्या. संहीता दाखल खुनातील गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

सदर सुचनां प्रमाणे मा. परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री. आर.डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक,

पोलीस अंमलदार पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोहेकॉ//विजयकुमार नंदे, पोहेकॉ/ मनोज परदेशी, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकॉ/ बालाजी कदम, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, पोकॉ/ इम्रान शेख, पोकों / भाऊसाहेब राठोड, पोकों / अंकुश पवार व सायबर सेल नांदेड येथील पोहेकों /

राजेंद्र सिटीकर, पोहेकॉ / दिपक ओढणे यांनी गुन्हयातील संशईत मयताचा मुलगा नामे 01. शेख यासेर अरफाद पिता शेख युनुस, वय 20 वर्षे व्यवसाय हॉटेल चालक राहणार दुल्लेशहा रहेमाननगर, वाघी रोड, महमुद फंक्शन हॉलचे पाठीमागे नांदेड यांचेकडे गुन्हया संबधाने

विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सांगीतले की, त्याचे मयत वडील हे त्यास व त्याची आईस मोठ्या प्रमाणावर मानसीक त्रास देत होते. त्यांना मारहान करीत होता तो त्रास असाहय झाल्या मुळे मयताच्या मुलांने त्याचा ओळखीच्या मित्र नामे शेख अमेर रा. चौफाळा नांदेड. यास वडील युनुस यांना मारण्याची सुपारी दिली होती.

त्या महीती वरुन आम्ही घटणास्थळाचे ठिकाणचे CCTV फुटेजची पाहीणी करुन गोपनीय बातमीदारा नेमण्यात आले त्यांचे कडुन प्राप्त माहीतीचे आधारे व सायबर सेल नांदेड यांचे सहर्कायाने तांत्रीक माहीती हस्तगत करुन त्या माहीतीच्या आधारे यातील

आरोपीताचे नावे निष्पण करुन आरोपी नामे 02. शेख अमजद पिता शेख ईसाख, वय 24 वर्षे व्यवसाय काळी पिवळी जीप चालक राहणार आंबेडकरनगर (सिकंदरनगर) मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक 03. योगेश शिवाजी निकम, वय 24 वर्षे व्यवसाय गवंडी /

मिस्त्रीकाम राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मनमाड, पोलीस ठाणे मनमाड तालुका नांदगांव जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे गुन्हया संबंधाने विचारपुस करता त्यांनी खुन केल्याची कबुली दिल्याने तपास अधिकारी सपोनी श्री प्रशांत लोंढे यांनी अटक करुन तिन आरोपीना

आज रोजी मा. न्यायालयात पी.सी.आर. कामी हाजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 10/09/2024 रोजी पर्यंत पि.सी.आर. मंजुर केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास करीत आहोत.