NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

जिल्हास्तरीय कुमार गट बॉल बॕडमिंटन स्पर्धा व निवड चाचणी

NANDED TODAY NEWS: 8,Sep,2023
अहमदपूर – दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान शेगाव बुलढाणा जिल्हा येथे होणाऱ्या ६८ व्या महाराष्ट्रा स्टेट ज्युनिअर बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप (मुले व मुली) यासाठी लातूर जिल्हा संघ निवड चाचणी व स्पर्धा यांचे

रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता किलबील नॕशनल स्कुल अहमदपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील ज्या खेळाडूंचा जन्म ०२/०१/२००४रोजीचा किंवा त्यानंतरचा असेल अश्या सर्व मुले व मुली खेळाडूंनी आपला

जन्मदाखला,आधारकार्ड, बोनाफाईड व नोकरीस असाल्यास कार्यालयाचे ओळखपत्र, प्रमाणपत्र सह स्पर्धा व निवड चाचणी साठी हजर रहावेत असे

आवाहन जिल्हा अध्यक्ष श्री संगमेश्वर निला, श्री ज्ञानोबा भोसले,सचिव असद शेख, मुख्याध्यापक श्री संतोष

पाटील,अकबर पठाण,अदनान शेख, तानाजी कदम व नईम शेख यांनी केले आहे.