NANDED TODAY: 30,Jan,2024 :- विविध क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींनी आम्ही कोठेही सामान्यांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे. यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत कला, क्रीडा यावर लक्ष केंद्रीत करीत राज्य, देशच नव्हे तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जागतिक दिव्यांग दिना निमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता वजिराबाद पोलीस परेड ग्राउंड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी अभिजित राऊत बोलत होते व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजित कौर जज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जि.प.चे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, प्रभारी वैसाका कुलदीप कलुरकर,
आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की, पथसंचलनातून आपल्यातील क्षमता दाखवण्यात येते. आपण सादर केलेल्या पथसंचलनातून आम्हीही सामान्या प्रमाणेच यश मिळवू शकतो असा संदेश दिला आहे. दिव्यांग विद्यार्थीही सामान्य विद्यार्थ्यासारखी कामगिरी करू शकतो त्यांच्यातील लपलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज असते.
दिव्यांगही इतरांसारखाच विकासाचा प्रमुख घटक आहे. शासनाच्या विविध योजना, दिव्यांग निधी बाबतही सुस्पष्टता आणत त्यांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्द करून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या की, इतरांपेक्षा दिव्यांगांत विशेष क्षमता असतात. भारतीय महिला तीरंदाज शीतल देवी. जगातील एकमेव हात नसलेली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने नुकतेच हँगझोऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत.
यातून दिव्यांगही सामान्यांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्ट होते. यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्सहान द्यावे असे आवाहन केले आहे. तर प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार म्हणाले की, जिल्ह्यात दिव्यांगांच्या ७० पेक्षा अधिक शाळा असून २ हजार ६०० विदयार्थी आहेत. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत ७६५ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला आहे. दिव्यांग शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रत्येक वर्षी स्पर्धा यशस्वी होत
असल्याचे सांगत शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कामाचे कौतुक केले. दिव्यांग विद्यार्थी राज्य देशच नव्हे तर पॅरा ऑलम्पिक स्पर्धेतही यशस्वी ठरले असल्याचे सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेस उपस्थित राहून दिव्यांग विद्यार्थ्यांस प्रोत्सहान दिल्या बदल उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे. सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार मुरलीधर गोडबोले यांनी मानले या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध प्रवर्गाच्या दिव्यांग शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!