NANDED TODAY: 12,March, 2024
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्या साठी दि.13/3/2024 रोजी नांदेड मध्ये सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,ज्येष्ठ नागरिक संघ वजिराबाद,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने “लक्षवेधी पदयात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे.
लक्षवेधी पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.पदयात्रेची सुरूवात नांदेड येथील ज्येष्ठतम नागरिक तथा ज्येष्ठ नागरिक संघांचे आधार स्तंभ मा.सुभाषजी बार्हाळे याच्या हस्ते हिरवी झंडी दाखऊन वजिराबाद चौकातून करण्यात येणार आहे.
पदयात्रेत गरिब, गरजवंत, दुर्लक्षित,शोषित,उपेक्षित,वंचित, विधवा तथा दिव्यांग शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी,असंघटित कामगार,शहरी व ग्रामिण भागातील ज्येष्ठ नागरिक भाग घेणार आहेत.जवळ जवळ पंधरा हजार ज्येष्ठ नागरिक या “लक्षवेधी पद यात्रेत” भाग घेण्याची शक्यता आहे.
ही पदयात्रा अत्यंत स्वंशिस्तित, चार चार ज्येष्ठ नागरिकांच्या श्रखंलेत,सावकाश चालत जिल्हाधि कार्यालया पर्यंतच रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत जातील. आयोजकांच्या वतीने देशाचे मा.पंत प्रधान नरेंद्रजीभाई मोदीसाहेब, मा.ना.एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री, मा.ना.देवेंद्रजी फडणवीससाहेब उप मुख्य मंत्री,मा.ना.अजित दादा पवारसाहेब उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची निवेदनें मा.जिल्हाधिकारी साहेबा मार्फत देण्या येऊन शेवटी डाॅ हंसराज वैद्य हे ज्येष्ठांना मार्ग दर्शन करतील व पदयात्रेची सांगता होईल.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!