नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. त्या समर्थनार्थ हडसणी (ता.हदगाव) येथील दत्ता पाटील हडसणीकर हे सलग ६ दिवसापासून उपोषण करत असून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथे दाखल केले आहे.
आज भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. याचवेळी जिल्ह्याचे खा.चिखलीकर यांनी भ्रमणध्वनीवरून उपोषणकर्ते पाटील यांच्याशी संवाद साधला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे.
उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनात राज्यात आंदोलनाला पाठींबा म्हणून गेल्या ६ दिवसांपासून दत्ता पाटील हडसणीकर हे आमरण उपोषण करत आहेत.
पाटील यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांनाही नांदेड विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज शुक्रवारी प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी विष्णुपुरी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. आस्थेवाईकपणे विचारपूस केले. याच वेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दत्ता पाटील हडसणीकर यांच्याशी मुंबई येथून फोनवर सकारात्मक संवाद साधला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ मराठा आरक्षणासाठी कटीबद्ध असून दत्ता पाटील हडसणीकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
शासकीय मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे, भाजपा युवा मोर्चा महानगराध्यक्ष संजय पाटील घोगरे, नांदेड भाजपा दक्षिण तालुकाध्यक्ष सुनील मोरे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे, पत्रकार संग्राम मोरे,
अनिल मोरे, सुधीर हंबर्डे, पप्पू पावडे, डॉ.मनूरकर, सुमित जोशी, रवी घुले यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान सर्व प्रणिताताई देवरे – चिखलीकर यावेळी बोलताना म्हणाल्या की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील
मराठा समाजाला आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकले होते मात्र आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला तिथे योग्य पाठपुरावा करता आला नाही. पुरावे, दाखले देता आले नाहीत.
त्यामुळे सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकू शकले नाही ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती. तरीही आताही मराठा समाजाने चिंता करण्याचे कारण नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारचा
सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आवश्यक त्या पाठपुराव्यासह हे आरक्षण कायमस्वरूपी टिकली पाहिजे यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
त्यामुळे मराठा समाज बांधवांनी संयम बाळगावा असे आवाहनही सौ.प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांनी या निमित्ताने केले आहे.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!