NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

मानधनासाठी सत्पात्री मतदान करा- डॉ.हंसराज वैद्य नांदेड

NANDED TODAY : 9,Sep,2023 नांदेड,(प्रतिनिधी)-प्रतिमहा महिण्याचा पहिला रविवार दि 3/9/23 रोजीची सभा स्वा.से.डॉ.दादारावजी वैद्य (आर्य) सभागृहात ज्येष्ठ नागरिकांची सभा सकाळी 11 वाजता संपन्न झाली. सहयोग ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.हंसराज वैद्य यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना मानधनासाठी सत् पात्री मतदार करण्याचे आवाहन केले.

अनेक ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या सभेत ज्येष्ठ महिला-पुरूषांसह अनेक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेस मार्गदर्शन करतानां ते पुढे म्हणाले की, सरकारने आम्हा ज्येष्ठ नागरिकांना तुच्छ तथा क्षुल्लक समजू नये. गृहित धरू नये. आता बस्स झाले. आम्ही नोंदणीकृत व अनोंदणीकृत महिला-पुरूष मिळून एकूण लोक संख्येच्या 18 टक्के ज्येष्ठ नागरिक आहोत.

एकट्या महाराष्ट्रात जवळ जवळ आडिच कोटी ज्येष्ठ नागरिक असून हा घटक अत्यंत दुर्लक्षित आहे. शासन ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणत नाही. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना इतर शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक तथा तेलंगाना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनां मिळत असलेल्या मुलभूत सुख सोई आणि मानधन ईथल्या ज्येष्ठ नागरिकांनां मिळत नाहित.

त्या राज्यातच नव्हे, भारतातील सर्व राज्यात व जगात ज्येष्ठांची वयो मर्यादा 60 वर्ष मान्य असताना महाराष्ट्र राज्यात मात्र 65 वर्ष गृहित धरले जाते. असे का? आम्ही या पुरोगामी महाराष्ट्रात जन्मलो हा आमचा गुन्हा आहे का? महाराष्ट्रातील राजकिय पक्षातील एकूणच नेत्यांना व कार्यकर्त्यांना ज्येष्ठांची किंमत अजूनही कळली नाही.

स्वतः ज्येष्ठांना व ज्येष्ठ नागरिकांच्या आम्हा नेत्यांनाही आपली स्वतःची किंमत समजली नाही.! आपण सरकार बदलू शकतो एवढी ताकत आपल्यात आहे.! आपण आता जागरूक होऊन लढू यात. आपण आपल्या न्याय मागण्या मिळेपर्यंत आता थांबायचं नाही असा संकल्पच करूयात.

आता पर्यंत राज कारण्यांनीं आमचा फक्त वापर केला आहे. आता मात्र येत्या प्रत्येक निवडणूकित आपणास ईच्छूक उमेदवाराला निवडून आल्यावर ज्येष्ठ नागरिकाच्या मानधना बद्दल सभागृहात आवाज उठविण्याचे अभिवचन घेऊनच चार चौघांत त्याच्या प्रिय आई-बाबाची शपथ घ्यायला लाऊन मतदान करा. आपले अमुल्य मतदान सत् पात्री करा.

आपण आज पर्यंत मतदान विकलेले नाही. आताही विकू नका. जो पक्ष आपली इज्जत करतो, आपले मुल्य जानतो तथा ठेवतो त्याच पक्षाच्या ऊमेदवाराला हमी घेऊन मतदान करा. आपण शंभर टक्के मतदान करतो. आपण सरकार आणू शकतो व बिन कामाचे सरकार पाडूहि शकतो याचे भान ठेवा. अजून निवडणूकीसाठी तिन महिण्याचा अवधी आहे.

सर्व नेत्यांना निवेदने दिलेली आहेत. जो पक्ष आपल्या निवणूक जाहिरनाम्यात ज्येष्ठांच्या प्रश्नांना प्राधान्य देईल तो पक्ष आपला. दुसरी महत्वाची बाब अशी की या सरकारने आपले प्रश्न जर सहानुती पूर्वक हाताळले नाहित, सोडविले नाहित, सर्वांनां नाही फक्त गरजूनां दुर्लक्षित, वंचित, विधवा, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार ज्येष्ठ नागरिकांनां इतर शेजारील राज्या प्रमाणे 3500/-रू फक्त मानधन देणार नसेल तर आपणास रस्त्यावर उतरून अनशन आंदोलनास तयार रहावे लागेल, असा