नांदेड टुडे : 29,सप्टेंबर,2023 आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विचारवंत, वो साहित्य ,बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक ,दलित पँथर या लढाऊ संघटनेचे संस्थापक तसेच मास मुमेंट ,सम्यक क्रांती व फुले आंबेडकर विचारधारा इत्यादी सामाजिक संघटनेचे
संस्थापक ,धर्म ,समाज, साहित्य व राजकारण यात आंबेडकरवादी भूमिका प्रखरतेने घेऊन मांडणारे चिकित्सक अभ्यासक राजा ढाले यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले पुतळा आयटीआय कारणर नांदेड येथे ३० /९/२०२३ सकाळी 11 वाजता
अभिवादन सभेचे आयोजन फुले आंबेडकर विचारधारा या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केले आहे . या अभिवादन सभेस प्राध्यापक राजेंद्र गोणारकर हे संबोधन करणार आहेत तेव्हा या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे
आवाहन एन डी गवळे, राज गोडबोले ,ईश्वर सावंत ,कोंडदेव हटकर ,सुभाष सुर्यतळ ,डी डी भालेराव,अरविंद कदम ,प्रतीक मोरे अशोक एडके,नितीन ऐगडे, एन एम झडते ,प्रभू ढवळे इत्यादींनी केले आहे.
More Stories
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या परिवाराकडून नांदेडकराच्या शिरपेचात मानाचा तुरा!आम्ही वारकरी परिवाराने पंढरपूर येथे धर्म शाळेसाठी घेतलेल्या जागेची रजिस्ट्रि संपन्न!
कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे :जिल्हा प्रमुख न्यायाधीश सुरेखा कोसमकर.!
महिलाओ समेत देश के लाखो नागरिकों का मानवी अधिकारों का उलंघन होता है: कंचन ठाकुर दिल्ली!